आई..... एकदा एक शहरातील - TopicsExpress



          

आई..... एकदा एक शहरातील परिवार ज्या मध्ये नवरा,बायको व त्यांचा छोटासा मुलगा असतो ते सर्कस पहायला जातात, सर्कस खूप भव्य-दिव्य असल्याने गर्दीपण खूपच जास्त असते... . त्या गर्दी मध्ये त्यांचा मुलगा हारवतो, दोघे त्याला खूप शोधतात पण तो सापडत काही सापडत नाही... . मुलाची आई खूप रडायला लागते, मुलाचे वडील तिला शांत करतात व मुलाला शोधण्यासाठी तेथे असलेल्यापोलीसां ची मदत घेतात..... . एका आईसक्रिम च्या गाड्याजवळ रडतबसलेला त्यांचा मुलगा त्यांना मिळतो.... . आई आनंदाने हसू लागते पण वडलाच्या डोळ्यात वेगळच दुखं असतं..... . मुलाचे वडील मुलाला कडेवर घेतात आणि म्हणतात चल गावी..... . तेवढ्यात त्याची पत्नी म्हणते, आपण तर इथेच राहतो...या शहरात!!!.... . त्यावर मुलाचे वडील म्हणतात, तू तुझ्या मुला शिवाय एक तास पण राहूशकत नाहीस , आणि माझी आई माझ्याशिवाय गावात १०वर्षापासून राहतेय... आज पासून मी पण माझ्या आई सोबत राहणार..........
Posted on: Mon, 18 Nov 2013 11:31:17 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015