*.परवा भेटला बाप्पा, जरा - TopicsExpress



          

*.परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला.* *."दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला.* *."उंदीर कुठे पार्क करू.? लॉट नाही सापडला".* *.मी म्हटले"सोडून दे, आराम करू दे त्याला".* *."तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस.?.* *.मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस.?".* *."मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक.* *.तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक.* *."इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो.* *.भक्तांना खुश करेपर्यत खूप खूप दमतो".* *."काय करू आता माझ्याने manage होत नाही.* *.पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत".* *."immigration च्या requests ने system झालीये hang.* *.तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग".* *."चार-आठ आणे देऊन काय काय मागतात.* *.माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात".* *."माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation.* *.management च्या theory मध्ये मिळेल तुला solution".* *."M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे.?.* *.Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे.?".* *."असं कर बाप्पा एक Call Center टाक.* *.तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक".* *."बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको.* *.परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको".* *.माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाल.ा* *."एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला".* *."CEO ची position, Townhouse ची ownership.* *.immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship".* *.मी हसलो उगाच,"म्हटलं खरंच देशील का सांग.?".* *.अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग.?.* *."पारिजातकाच्य ा सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं.* *.सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं".* *."हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव.* *.प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव".* *."देशील आणून मला माझी हरवलेली नाती.?.* *.नेशील मला परत जिथे आहे माझी माती.?".* *."इंग्रजाळलेल् या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं.* *.आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं.?".* *."कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गजर.* *.भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार".* *."यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान.* *.देशील का रे देवा, यातलं एक तरी दान.?".* *."तथास्तु"म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय पोरा,"सुखी रहा"म्हणाला. .
Posted on: Sun, 25 Aug 2013 05:46:43 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015