*परवा भेटला बाप्पा, जरा - TopicsExpress



          

*परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला* *"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला* *"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"* *मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"* *"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस? * *मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"* *"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक* *तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"* *"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो* *भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"* *"काय करू आता माझ्याने manage होत नाही* *पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"* *"immigration च्या requests ने system झालीये hang* *तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"* *"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात* *माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात"* *"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation* *management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"* *"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?* *Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"* *"असं कर बाप्पा एक Call Center टाक* *तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक"* *"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको* *परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"* *माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला* *"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"* *"CEO ची position, Townhouse ची ownership* *immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"* *मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"* *अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग? * *"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं* *सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"* *"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव* *प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"* *"देशील आणून मला माझी हरवलेली नाती? * *नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"* *"इंग्रजाळलेल्य ा पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं* *आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"* *"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल- ताशांचा गर्जार* *भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"* *"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान* *देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"* *"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा" म्हणाला......*
Posted on: Sat, 07 Sep 2013 10:59:45 +0000

Trending Topics



body" style="min-height:30px;">
Estreno en Cinemundo. "Trance" Disponible en DVD y BLU

Recently Viewed Topics




© 2015