मुंबई : मुंबईत मुसळधार - TopicsExpress



          

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाच्या संततधारेमुळे सामान्य जनजीवन विक्सळीत झालं आहे. मुंबई आणि उपनगरांसह शेजारच्या महापालिका क्षेत्रासाठी लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेचाही पावसाने खोळंबा झाला आहे. मुंबईतील पाणी साठण्यासाठी प्रसिद्ध असलेले सखल भाग - सायन, दादर टीटी, हिंदमाता, परळ आणि माटुंग्यात अनेक ठिकाणी पाणी साचलंय. उपनगरातही अनेक सखल भागात पाणी साठल्याच्या बातम्या येत आहेत. पश्चिम उपनगरांमध्ये मालाड सबवे, गोरेगाव लिंक रोड, अंधेरी ईस्ट स्टेशन रोड या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा आला. मुंबईप्रमाणेच गुजरातमधील मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या वाहतुकीला मोठा फटका बसलाय. पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल चर्मिनसहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तर अनेक गाड्यांच्या वेळा आणि मार्ग बदलण्यात आले आहेत. तसंच काही गाड्यांची सेवा पावसामुळे मर्यादित करण्यात आलीय. गुजरातमधल्या वलसाड स्टेशनमधील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक प्रभावित झालीय. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून रद्द झालेल्या तसंच मार्ग आणि वेळा बदलण्यात आलेल्या गाड्यांची माहिती अशी : वेळा बदलण्यात आलेल्या गाड्या Rescheduling of trains for 12 July, 2013 1) 12953 A K Rajdhani exp to leave at 00.35 hrs (mid night) 2) 12903 Golden Temple mail to leave at 23.55hrs 3) 19143 Lokshakti exp to leave at 23.55hrs 4) 12216 Garib Rath to leave at 19.35hrs 5) 19005 Saurashtra Mail to leave at 04.55hrs on 13th July, 2013 6) 12955 Jaipur Exp to leave at 00.55hrs (mid night) रद्द करण्यात आलेल्या ट्रेन्स 1) 12922/ 12921 (Surat-Mumbai Central-Surat Flying Ranee Express) 2) 12933 (Karnavati Express - Mumbai Central-Ahmedabad) 3) 12931 (Mumbai Central-Ahmedabd Double Decker Express) 4) 59024/ 59023 (Valsad-Mumbai Central-Valsad Fast Passenger) 5) 12929/ 12930 (Valsad-Dahod- Valsad Intercity Express) 6) 59038 (Surat-Virar Shuttle) 7) 59047 (Virar-Sirat Shuttle) 8) 19114/ 19113 (Vadodara-Bhilad-Vadodara Express) 9) 19109/19110 (Valsad-Ahmedabad-Valsad Gujrat Queen Express) 10) 19130/ 19129 (Ahmedabad-Vadodara-Ahmedabad Intercity Express) अर्ध्यावरच प्रवास संपवण्यात आलेल्या गाड्या 1) 12934 (Ahmedabad-Mumbai Central Karnavati Express) cancelled Between Surat-Mumbai Central) 2) 12932 (Ahmedabad-Mumbai Central Double Decker Express) cancelled between Surat-Mumbai Central 3) 59050 (Viramgam-Valsad Express) cancelled between Vadodara- Valsad and reversed as Vadodara-Viramgam 4) 19011 (Mumbai Central-Ahmedabad Gujrat Express) short terminated at Vapi 5) 12009 (Mumbai Central-Ahmedabad Shatabdi Express) short terminated at Udvada 6) 19012 (Ahmedabad-Mumbai Central Gujrat Express) short terminated at Surat and reversed as 19011 Gujrat Express from Surat to Ahmedabad.
Posted on: Fri, 12 Jul 2013 11:31:43 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015