SWARANANDWAN che Director Shri Sadashiv Tajne s Birthday on 22nd - TopicsExpress



          

SWARANANDWAN che Director Shri Sadashiv Tajne s Birthday on 22nd Sept आनंदवनात अपंगत्वावर दुर्दम्य इच्छेने मात करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया घालणारे सदाशिव ताजने यांचा २२ सप्तेबर रोजी वाढदिवस आहे. सदाशिव ताजने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! देण्यासाठी संपर्क ९०११०९४६०९ सदाशिव ताजने यांचे मूळ गाव भद्रावती तालुक्‍यातील राळेगाव असून जन्मानंतर अवघ्या दोन वर्षांतच त्यांचे दोन्ही पाय पोलिओने अधू झाले. आईवडिलांच्या कपडे धुण्याच्या व्यवसायातून त्यांच्यावरील उपचारासाठी मोठी रक्‍कम उभी राहू शकली नाही. कालांतराने सदाशिव दोन्ही पायांनी अपंग झाले. त्यानंतर वरोरा येथे मामाकडे राहून ते शिकत होते. दरम्यान, नामदेव बोरकर या मित्राच्या ओळखीने त्यांना आनंदवनात प्रवेश मिळाला. आनंद निकेतन महाविद्यालयात शिकत असतानाच ते दुपारी संधी निकेतन या वर्कशॉपमध्ये मुद्रणाचे काम शिकू लागले. बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हस्तकला, विणकाम आदी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्या. यानंतर त्यांनी लिपिक, टंकलेखक, लेखापाल असा नोकरीचा प्रवास केला. आपल्या अपंगत्वावर मात करीत अतिशय कष्टात मेहनतीने शिक्षण घेऊन आपले भविष्य निर्माण केले. सध्या ते संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा येथे व्यवस्थापकीय अधीक्षकपदी कार्यरत आहेत. डॉ. गोविंद कासट यांनी सदाशिव ताजने यांच्या जीवनावर पुस्तक लिहिले आहे. डॉ. विकास आमटे यांचा आदिवासींच्या विकासावरील प्रकल्पाचे काम मूळगव्हाण (ता. झरीजामणी, जि. यवतमाळ) येथे सुरू असून त्यासाठी सदाशिव ताजने यांनी आपल्यावरील पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेला दहा हजारांचा नफा दिला आहे. संबंधित पुस्तकाची मराठी आवृत्ती 21 जून 2008 प्रकाशित झाली असून या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद एस. सी. चांडक आणि एस. व्ही. शिरभाते यांनी केला असून, पुस्तकात लेखकाने सदाशिव ताजने यांच्या जीवनकार्याचा संपूर्ण आढावा घेतला आहे. Devnath Gandate Chandrapur -- Blogger यांनी काव्यशिल्प येथे ९/२१/२०१३ ०९:५५:०० PM वाजता पोस्ट केले
Posted on: Sat, 21 Sep 2013 16:30:12 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015