Sorry. मगाशी posted स्टोरी post - TopicsExpress



          

Sorry. मगाशी posted स्टोरी post झाली. एका मित्राची गोष्ट आहे. हि गोष्ट रोहित सनेर ह्याने लिहिली आहे. "ह्या पानाच्या इतर गोष्टी वाचून मलाही एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही आमचे जुने घर पाडून नविन घर बांधणार होतो त्या साठी भाड्याच्या घरात रहायला गेलो.सगळ सामान लाऊन झाल आणि माझे वडिल दुसर्या गावात कामाला होते म्हणुन ते कामावर निघुन गेले. आता घरात मी माझी आई व माझ्या दोन बहिनी असे राहु लागलो. काही दिवसानंतर आम्हाला त्या घरात अजुन कोणितरी असल्याचा भास होऊ लागला पण आम्ही दुरलक्ष केलं. काही दिवसांनी माझी मोठी बहिन आजारी पडली आणि अचानक तिच्या तोंडुन आवाज येनं बंन्द झालं, आणि अचानक तिच्या पोटात खुप दुखु लागलं, ती आम्हाला ईशारा करुन काहीतरी दाखवायची पण आवाज नसल्याने आम्हाला काही कळत नव्हते, ताई नेहमी टि.व्हि समोर जाऊन झोपायची आणि रडायची. सर्व डॉक्टर झाले, सर्व औषधोपचार करुन झाले पण काहि उपयोग होत नव्हता. माझे वडिल परत आले, माझ्या काकांनी त्यानां मांत्रिकाला बोलवण्याचा सल्ला दिला पण वडिल ते सर्व मनात नसल्याने त्यानीं काकानां नकार दिला. काहि दिवस गेले बहिनीला आराम नव्हता. मंग शेवटि वडिलांनी हार मानून मांत्रिकाला बोलवायचं ठरवलं. मांत्रिक आला आणि घरात पा़य ठेवताच तो उच्चारला कि ईथे ऐका आत्माचा वास आहे. मंग तो बहिनी जवळ गेला ती तिथेच टि.व्हि समोर झोपुन रडत होती. मंग मात्रिकाने तिला बघितलं आणि मंग आम्हाला पुजेचं सामान आण्यास सांगितले. आम्ही सर्व सामान ताबडतोब आणुन दिला मंग त्याने पुजा सुरु केली, त्याने मंत्राचा सुरु केला व बहिनीला जोर जोरात मारु लागला. कोण आहेस तु? काय पाहिजे तुला? का ह्या मुलीला त्रास देत आहेस? प्रश्न अजुन संपलेही नव्हते आणि माझी बहिन हसु लागली ती म्हणाली मी हिला पकडले आहे मीच हिच्या पोटावर बसतो म्हणुन हिचे पोट दुखत आहे आणि मीच हिचा गळा दाबत आहे म्हणुन हि बोलु शकत नाही. मांत्रिकाने विचारले तुला काय हवं आहे? ताई पुन्हा बोलु लागली ती म्हणाली मला न्हाय पाहिजे, मांत्रिकाने विचारले कसलं न्हाय? बहिन बोलली, खुप वर्षा पुर्वी मला चार लोकांनी बंदिस्त केलं होतं आणि ह्या घरात आणुन माझ्यावर खुप वेळेस बलात्कार केला आणि शेवटी माझा खुन करुन मी जिथे झोपली आहे तिथेच मला पुरले आहे. मांत्रिकाने मंग आणखी मंत्रांचे उच्चार केले आणि हळु हळु ताईची तब्येत सुधारत होती. अचानक ती जोरात ओरडली मला न्याय द्या, पोलिसांना बोलवा, मला न्याय हवा आहे. मंग आम्ही पोलिसांना फोन केला व घडलेली सर्व घटणा सांगितली. मंग पोलिसांनी तिथे खणुन पाहिले व खरच तिथे सांगाडे सापडले आणि पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आणि दुसर्या दिवशी ताई बरी झाली आणि तिने सांगितले मला ती मुलगी आधीही दिसत होती मी जेव्हा तुम्हाला सांगणार होती तेव्हाच तिने माझ्या शरीरात प्रवेश केला व माझा गळा दाबु लागली त्यामुळे माझा आवाज निघत नव्हता आणि ती माझ्या पोटावर बसायची म्हणुन माझं पोट दुखत होतं. तिच मला नेहमी त्या टि.व्हि समोर घेऊन जायची."
Posted on: Sun, 21 Jul 2013 19:34:39 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015