आजची स्टोरी नेहा वारङे - TopicsExpress



          

आजची स्टोरी नेहा वारङे हिची आजचा दिवस हि नेहमी सारखाच . collage , friends, लेच्तुरेस. पण आज lectur मध्ये सर अंनि थोडा वेगळ्या विषयावर चर्चा केली ... आणि विषय होता भूत .. आम्ही psycology चे students त्यामुळे अश्या गोष्टींचा आमच्या syllabus शी कुठेना कुठे संबंध तर येतोच ... पुढचा एक तास भूत-पिशाच्च असते की नसते, ह्यापासून तुम्हाला आलेले भुताचे अनुभव इथपर्यंत सर्व चर्चांमध्ये रंगून गेला. लेक्चर संपल्यावर वैजयंती, कीर्ती आणि शमिका बाहेर पडल्या. दरवाजाबाहेर थांबून आदित्य आणि गिरीशची वाट पाहत उभ्या होत्या. आज विक्रम कॉलेजला आला नव्हता. काल रात्री ट्रेकवरून उशिरा परत आल्याने, सकाळची लेक्चर्स बुडली होती. तो १२:३० च्या सुमारास कॅन्टीनमध्ये भेटणार होता. सगळे कॅन्टीनकडे निघाले. “आद्या लेक्चर काय सही झालं ना रे”, चालता चालता गिरीशने विचारले. “भन्नाट, मी विचारच केला नव्हता. भडभडे बाप माणूस आहे.”- आदित्य. “आता तो विषय नको” शमिका जवळ जवळ किंचाळली. “का ग? घाबरलीस कि काय?”-गिरीश. “घाबरले वगैरे नाही रे गिऱ्या” -शमिका. “घाबरली कसली नाही. लोक अनुभव सांगत होते, तेंव्हा माझा हात धरून बसली होती पूर्णवेळ.” वैजू हसत म्हणाली. शमिकाने वैजूकडे चिडून एक कटाक्ष टाकला. “हे भूत-बित सगळं झूट आहे यार!” -गिरीश. “मला भीती वाटली नाही. पण इन केस वाटली तर मी राम नाम घेते. वर्क्स लाईक magic!” -कीर्ती. “खरंय” -शमिका. “कसल्या तुम्ही पोरी, म्हणे psycology स्पेशल करणार!” -गिरीश. “ए तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतात ना मग गुमान शांतीला धरा.” -कीर्ती. बोलता बोलता कॅन्टीन आलं. विक्रम आधीच आला होता. आठ जणांचा एक टेबल त्याने राखून ठेवलं होतं. “हाय विक्या” -सगळे. “हेलो”-विक्रम. “कसा आहेस? ट्रेक कसा झाला?” -आदित्य “अरे सही झाला. पण सॉलिड दमलोय रे. रात्री फार उशीर झाला. झोप नाही झाली त्यामुळे.” -विक्रम. “ए कुठे गेला होतास ट्रेकला?” -वैजू. “राजगड!” -विक्रम. “काश… मला ही येत आलं असतं.” -वैजू. “पुढच्या वेळेला चल की. खरंतर पुढचा ट्रेक आपण सगळ्यांनी मिळून करूयात का?” -विक्रम “येस चालेल” -आदित्य. “चालेल नाही धावेल.” वैजू खूपच एक्साईट झाली. ती ग्रुपची tomboy म्हणून प्रसिद्ध होती. शमिका आणि कीर्तीनी एकमेकींकडे पाहिलं. दोघींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. “काउंट अस आउट! आम्ही येणार नाही.” -शमिका. कीर्तीने तिच्या उत्तरात आपला नकार मिसळला. “बर ट्रेकला आम्ही जाऊ, तुम्ही पिकनिकला तरी याल का?” -गिरीश. “पिकनिक कुठे?” -कीर्ती. थोडसं हायसं वाटून कीर्ती म्हणाली. “माझ्या मामाचं पालीला फार्महाउस आहे. ओवरनाईट पिकनिकला जाऊया तिकडे. आम्ही सकाळी ट्रेकला जाऊ, तुम्ही फार्महाउसवर थांबा. Hows that?” -गिरीश “लय भारी!” -आदित्य. “मजा येईल, मी आईला मोबाईल करते” -वैजू. “घरी विचारून सांगतो” -शमिका आणि कीर्ती. /div> हो नाही करता करता एकदाचा दिवस ठरला. ठरल्या दिवशी सगळे पालीच्या दिशेने निघाले. शमिकाच्या बाबांनी त्यांची जीप आणि ड्रायव्हर दिला होता. त्यामुळे पालीपर्यंत जाण्याची सोय झाली होती. पालीला पोहोचल्यावर, ट्रेकवाली मंडळी ट्रेकला गेली. शमिका आणि कीर्ती गाडीतून गावात हिंडून आल्या. संध्याकाळी सगळे परत फार्महाउसवर भेटले. फार्महाउस मोठं प्रशस्त होतं. गिरीशचा मामा एक आड एक शनिवार-रविवार चक्कर मारत असल्याने छान ठेवलेलं होतं. सगळ्या सोयी होत्या. ट्रेकवरून आलेल्या मंडळींची आवाराआवर झाल्यावर सगळे जेवायला बसले. घरून थोडंफार बांधून आणलं होतं. पिकनिकचं ठरल्या दिवशीच, कोणीकोणी काय काय आणायचं ह्याच्या याद्या झाल्या होत्या. शमिकाने मस्त मुगाच्या डाळीची खिचडी टाकली होती. सगळे पोटभर जेवले. रात्रीचे ९ वाजले होते. जेवण झाल्यावर सगळे दिवाणखान्यात, येऊन बसले. पत्त्यांचे डाव टाकायचं ठरलं. सहा जणांचं laddis. खेळता खेळता कीर्ती आणि आदित्य पुरते कंगाल झाले. कीर्तीची किरकिर सुरु झाली, “ए आपण वेगळं काहीतरी खेळुयात ना. पत्ते आता बोअर झाले.” “का हरायला लागलीस म्हणून?” -विक्रमने हसत विचारलं. “अहं, बोअर झालं. आपण अंताक्षरी नाहीतर डंब शेराज खेळुयात का?” “ए नको ही वैजू काय खुणा करते काही कळत नाही.” -आदित्य. “हाऊ आबाउट भुताच्या गोष्टी?..” – विक्रमला चेव आला. सकाळी लेक्चरचा सगळा वृत्तांत आदित्यने त्याला सांगितला होता. “नाहीतर प्लांचेट???” लोकांना पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा वेळी त्याने दिला नाही. “आय एम अप” -आदित्य. “मी टू!” -गिरीश. “दौडेगा.” -वैजू. “मला तर भीती वाटते पण ट्राय करू” -कीर्ती. “ए ती भुतं खरंच येतात का? येत असतील तर नको बाबा. अरे घाबरलेल्याच्या मानगुटीवर बसतात म्हणे.” -शमिका. “शमे यार ग्रो अप. भूतबित काही नसता यार.” -गिरीश. “अग काही नाही होत. सॉलिड मजा येते. आम्ही खूप वेळा ट्रेकच्या इथे केलं आहे. तुम्हाला भीती वाटायला लागली तर आपण थांबू तिथेच. ए गिऱ्या, स्वयंपाकघरातला पाट आणि वाटी घेऊन ये रे!” -विक्रम. “ए नको रे. सॉलिड मजा कसली नंतर लिक्विड सुटायची वेळ यायची.” -शमिका. शमिका नको म्हणेपर्यंत गिरीश किचनपाशी पोहोचला ही होता. “मी झोपायला जाते. मला हे असलं काही करायचं नाही. कीर्ती तू येतेस का झोपायला?” -शमिका. “शमे ५ मिनिटं बस मग जाऊ.” -कीर्ती. कीर्तीने शमिकाला जबरदस्ती थांबवलं. गिरीश आणि विक्रम प्लांचेटच्या तयारीला लागले. पाट उलटा ठेऊन त्यावर ए तो झेड अक्षरं लिहिली. दिवे गेले तर पर्याय म्हणून आणलेली मेणबत्ती पेटवून उलट्या वाटीवर लावली. “कोणाला बोलवायचं?” -आदित्य “गांधी नाहीतर नेहरू?” -विक्रम “इतिहास पक्का आहे का? त्यांनी उलटे प्रश्न विचारले तर?” -गिरीशची आपली उगाच टिंगल. “मग तुम्ही सांगा.” -आदित्य. सगळे विचार करू लागले. “विनीत कुमारच्या भुताला बोलावू. मला तो सॉलिड आवडायचा, गेला बिचारा” -वैजू. विनीत कुमार उदयोन्मुख नट होता. तरुणपणीच कार अपघातात त्याचा दुर्दैवी अंत झाला. मद्य पिऊन कार चालवल्याचा त्याच्यावर आरोप होता. “चालेल. पण वैजू भुतं दिसत नाहीत. विनीत कुमार तुला दिसणार नाहीये” गिरीशची परत टिंगल. “माहितेय” -वैजू. “मी जातेय” -शमिका. “बस ग, अजून सुरु कुठे झालंय?” -कीर्तीने तिला हात धरून खाली बसवलं. मनातल्या मनात तीही “राम राम” जपतच होती. सगळी तयारी झाल्यावर विक्रमने भुताची आराधना सुरु केली. काही क्षणांनी वाटी फिरल्याचा भास झाला. “ए आला वाटतं” -आदित्य. “विनीतजी तुम्ही आलात का?” -विक्रम. काहीच झालं नाही. सगळे उत्कंठेने वाटीकडे पाहू लागले. “पूर्ण स्पेलिंग करायचं नसेल तर ‘येस’ साठी Y आणि ‘नो’ साठी N सांगा.” -परत विक्रम. वाटी Y कडे सरकली. “येस”, वैजू आनंदाने किंचाळली. “कसे आहात?”, आपण चुकीचा प्रश्न तर विचारला नाही ना म्हणून गिरीशने जीभ चावली. उत्तर आलं नाही. “ए गिऱ्या उगाच भडकवू नको रे!” -विक्रम. “तुमच्या निधनाचे आम्हाला खूप दु:ख आहे” -वैजू. वाटीने O आणि K वर सरकून ‘OK’ म्हणलं. “तुम्ही दारू प्यायली होती काहो गाडी चालवताना ?” -आदित्य. सगळ्यांनी चमकून आदित्यकडे बघितलं. शब्दबाण सुटला होता. आता काही करणं शक्य नव्हतं. उत्तरासाठी सगळे वाटीकडे पाहू लागले. वाटी Y कडे सरकली. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचा आदित्यला हायसं वाटलं. “विचारा कोणीतरी” -विक्रम. “तुमचा पायल बावेजावर खरच प्रेम होता काहो?” -वैजू. ‘विनीत कुमार आणि प्रेम’ हा वैजूच्या जिव्हाळ्याचा विषय होता. विनीत कुमारने तिला इतकं झपाटलं होतं की, “आमची दोघांचीही नावं ‘V’ वरून आहेत हा योगायोग नाही. देवाने ते मुद्दामच केलंय” असा काहीसं ती बडबडायची. वाटी अलगद Y कडे सरकली. “अजूनही आहे का?” -परत वैजू. वाटी अलगद N कडे सरकली. “का?” -वैजू. “ए वैजे, सगळे प्रश्नं तू विचारणार आहेस का? आम्हाला पण विचारायचंय.” -गिरीश. वैजू फिरंगुटून गप्प बसली. “पायलने अतुल चौधरीशी लग्न केलं म्हणून तुम्ही चिडला आहात का?” -गिरीश. एकेकाळी पायल आणि विनीतची मैत्री वर्तमानपत्रांचे रकाने भरत होती. विनीत जाण्याच्या काही दिवस आधी, पायल आणि त्याचं ब्रेक-अप झालं होतं. त्यामुळे विनीत खचून दारूच्या आहारी गेला होता. वाटी Y कडे सरकली. प्लांचेट यशस्वी होत असल्याचा विक्रमला आनंद होता. “तुम्हाला वरती आता कोणीतरी मेनका भेटली असेलच की करमणुकीला?” -गिरीशची पुन्हा टिंगल. “ए गिऱ्या.” -वैजू. वाटी थरथरू लागली. “ए चिडला का रे तो?” -आदित्य. “बहुतेक!” -विक्रम. “मी चालले” -शमिका सोफ्यावरून उठून खोलीच्या दिशेने चालू लागली. “ए थांब, मी पण आले.”, कीर्ती तिच्या मागे गेली. वाटीची थरथर थांबली. “विनीतजी तुम्ही आहात का?” -विक्रम. बराच वेळ थांबूनही उत्तर आलं नाही. “गेला वाटतं परत!” -विक्रम. “आता झोपायचं का? खूप उशीर झालाय” -वैजू. मेणबत्ती विझवून, पाट आणि वाटी जागेवर ठेवून सगळे आपापल्या खोल्यांत गेले. सकाळी हलकीशी जाग आल्यावर, वैजूला चेहरा ओढल्यासारखा वाटला. चेहऱ्यावर काहीतरी लागलं होतं. ओढली गेल्याने कातडी दुखत होती. तिने उठून आरश्यात पाहिलं. चेहऱ्याला टूथपेस्ट लावली होती कोणीतरी. पेस्ट वाळून कडक झाल्याने कातडी ओढली गेली होती. तिने वळून, झोपलेल्या शमिका आणि कीर्तीकडे पाहिलं. त्यांच्याही चेहऱ्याला पेस्ट लागली होती. त्यांना झोपेतून उठवून, “हे नक्की विक्रमचं काम आहे”, असं म्हणून ती झपाझपा विक्रमच्या खोलीकडे चालत गेली. दार वाजवलं, विक्रमने चेहरा पुसतच दरवाजा उघडला. “विक्या, गाढवा हे काय केलंस?” -वैजू. “काय?” -विक्रम बोलण्याच्या मूडमध्ये नव्हता. तोही चेहऱ्याची पेस्ट धुवूनच बाहेर येत होता. “ही पेस्ट…”-वैजू. शमिका आणि कीर्ती मागून चालत येत होत्या. “अग मी नाही लावली.” -विक्रम. “फेक आता” -वैजू. “अग खरंच सांगतो. माझ्याही चेहऱ्याला लावली होती कोणीतरी.” -विक्रम. वैजूचा आरडाओरडा ऐकून, गिरीश आणि आदित्यही उठून बाहेर आले. त्यांच्याही चेहऱ्याला पेस्ट होती. सहा जणांपैकी फक्त विक्रमच्याच चेहऱ्याला पेस्ट नव्हती. “तूच लावलीस.” -शमिका आणि कीर्ती. “ऐकाssss माझ्याही चेहऱ्याला होती, मी धुतली रे आत्ताच.” -विक्रमने समजवायचा खूप प्रयत्न केला. “टूथपेस्ट तूच आणणार होतास, म्हणजे तूच लावलीस.” -कीर्ती. “अरेच्च्या, मी टूथपेस्ट आणलीय पण अजून तिला हातही लावला नाहीये.” -विक्रम. “तूच!!! तू दोन आणल्या असशील. एक आम्हाला लावली आणि एक भरलेली आता आम्हाला दाखवशील.” -वैजू. “अग नाही ग बायांनो! गिऱ्याने केलं असेल. त्याला कालपासूनच टिंगल करायचा मूड होता.” -विक्रम “ए मी नाही! स्वताच्या चेहऱ्याला मी का लावून घेईन?” -गिरीश. विक्रमने sac पहिली. टूथपेस्ट अजूनही तशीच होती. सीलसकट. त्याने तिला हातही लावला नव्हता. हा नक्की गिरीशचाच खोडसाळपणा हे त्याने मनात पक्कं ठरवलं होतं. बाकी सगळे विक्रमनेच हे केलय असं समजून त्याला शिव्या देत होते. एकूण पिकनिकला धमाल आल्याने सगळे खुश होते. परत पुन्हा पालीला, फार्महाउसवर यायचं ठरलं. सकाळचा चहा घेऊन, आंघोळी करून सगळे जीपमधून पुण्याला परत निघाले. दूर कुठेतरी एका स्मशानाचा रखवालदार त्याची हरवलेली टूथपेस्ट शोधत होता. त्याच स्मशानात, विनीत कुमारच्या कबरीपाशी एक संपलेली टूथपेस्ट पडली होती...
Posted on: Thu, 12 Sep 2013 03:01:29 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015