आपल्या देशाचे जगात - TopicsExpress



          

आपल्या देशाचे जगात कायदेशीर नाव भारत असले तरी आपल्या देशातील अनेक हिंदू बांधव भारत या नावाबरोबरच हिंदुस्थान असेही संबोधतात.जन्माच्या दाखल्यावरील नाव आपण कायदेशीर नाव म्हणूनच मान्य करतो .पण त्या नावाशिवाय इतरही एखादे नाव असते आणि लोक त्याला अनेकदा त्या इतर नावानेच हाक मारतात.त्याला कुणी हरकत देखील घेत नाही .तसेच हिंदुस्थान या नावाचे देखील आहे .हिंदू धर्माच्या इतिहासाच्या तुलनेत आपल्या प्रिय भारत देशास स्वातंत्र्य मिळून काही वर्षच झाले असल्याने स्थानिक हिंदू धर्मियांच्या मनातून शेकडो वर्षांपासून चालत आलेले हिंदुस्थान हे नाव कुणी कितीही प्रयत्न केला तरी कधीच नष्ट होणार नाही.परकीय मुसलमान टोळ्या आपल्या देशावर आक्रमण करीत असताना हिंदुस्थानवर आक्रमण केले असे म्हणत असल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात.त्याकाळात ते भारत हा शब्द देखील उच्चारत नसत .कारण बहुसंख्येने हिंदू धर्मीय राहत असल्याने आपला देश हिंदुस्थान म्हणूनच ओळखला जात असे .छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही पत्र व्यवहारात भारत हे नाव आढळणार नाही पण हिंदवी स्वराज्य ,हिंदू धर्म इत्यादी शब्द मात्र आढळतात.औरंगजेबानेही शिवराज्याभिषेकाची बातमी मिळाल्या नंतर हिंदू पद पातशाही निर्माण होणे हि अल्लाचीच इच्छा दिसते असे म्हटल्याचे वाचनात येते .हा देश हिन्दुस्थानच आहे याचे इतिहासातील अनेक पुरावे देता येतात .त्यामुळे भारत या देशाला भारतीय गणराज्य असे नाव असताना आणि हिंदुस्थान या नावाने जगात भारताला कोठेच संबोधले जात नसताना भारताला हिंदुस्थान म्हणण्याचे प्रयोजनाच काय ? असा प्रश्न या देशातील काही उच्चविद्याविभूषित मंडळीना पडतो तो यापुढे पडणार नाही अशी अपेक्षा आहे.जय रोहिदास
Posted on: Fri, 27 Sep 2013 19:04:14 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015