एका युवकाची आणि एक - TopicsExpress



          

एका युवकाची आणि एक मुलीची ओळख झाली आपल्या फेसबुक माध्यमातून,,,,रोजच ओनलाईन बोलन सुरु झाल…ते एवढे चांगले मित्र झाले कि एकमेकांशी गप्पा मारल्याशीवाय ते रहात नसत…. या काळात अनेक वेळा भांडण आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले…किमान ३ ते४महिने हे असेच चालू होते…परंतु त्या युवकाने तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही…. आणिएकदिवस चक्क त्यामुलीने त्याला विचारले. तू माझ्यावर प्रेम करतोस? दोघांनी एकमेकांना समोरासमोर कधीच पाहिले नव्हते. फक्त फोटो पाहिले होते….तिच्या त्या प्रश्नावर त्या युवकाने उत्तर दिले. हो. करतो मी प्रेम तुझ्यावर प्रेम मग त्या युवतीने त्याला विचारले याआधी तू का नाही बोललास ? युवक म्हटला मला माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम करतेस का ते? पण मी तुझ्यावर प्रेम करतोअसे सांगितले आणि तू मैत्रीही नाही ठेवली तर? अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार मिळाला आणिरोजचा गुड मोर्निंग हा शब्दआय. लव.यु कडे वळला….हळू हळू फोन वर बोलन चालू झाल. आणि फेसबुक वरील मैत्रीएवढ्या छान प्रेमात बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण दोघांशिवाय न रहाण्याच्या शपथा हे दोघे घेऊ लागले… वेळ आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच खरी…. पण तीच त्याला नेहमीचआमंत्रण असायचं…हा मात्र कामामुळे जाऊ शकत नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले कि आपण भेटायला जायचे….त्याचा गाव वरून तो तिच्या गावी निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचेअश्रू आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली…..भेटीचे ठिकाण ठरले त्या गावचे स्टेशन चे ते मोठे खांब त्याच्या खाली.. युवक तेथे पोहोचला त्याच्या आधी ती तेथे येऊन थांबली होती…. दोघांनी एकमेकाना पाहिलं आणि एकमेकांना कडकडून मिठीत घेतलं…कदाचित अस होईल हे दोघांना माहित नव्हत पण हे नक्की समजल…त्याच तिच्यावरआणि तीच त्याच्यावर खरच खर प्रेम होत… कुठे फिरायला जायचं हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी मंदिर असे उत्तर मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन घेण्यास गेले…. काय बोलायचं आणि काही नाहीहे प्रश्न चिन्ह दोघांच्याही चेहर्यावर होत….फोन वर आय. लव. यु ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर लवकर कोणी बोलेना….शेवटीयुवकाने धाडस केले आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर हाजीमलंग झाल आणि गप्पा सुरु झाल्या….किमान ४ तास, ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम करीत होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे सांगून युवकासोबत फिरत होती….शेवटी निरोप घेण्याची वेळ आली आणि…पुन्हा स्टेशन वरून दिवसभराच्या भेटीची सांगताझाली….. दोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला.कधीच न पुसण्यासाठी….अशी हि पहिली भेट झाल्यानंतर एक मेकांशीपुन्हा फोन वर बोलन चालू झाल… एवढ झाल कि एकमेकांनी लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं अस ठरवलं…किमान पुन्हा ४ महिने हे प्रेम प्रकरण चालू राहील आणि हा युवक तिच्याशीच नव्हे तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू लागला फक्ततिचे बाबा सोडून….दररोज तासान तास बोलन चालू असायचं….या दोघात कधीच कसलंही भांडण नाही झाल…..ऑगस्ट मध्ये त्यांनी साखरपुडा करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २०११ या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात अडकणार होते.. एक दिवस ते काहीतरी कारणास्तव बोलू शकले नाहीत…. दोघांनाही फार आठवण आली होती…सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो बंद होता आणि अकराच्या सुमारास तिच्या बहिणीचा फोन आला….कि ती काल रात्री ट्रेन मधून पडली आणि हे जगसोडून गेली……युवकाला काय करावे सुचेना उठून त्याने तिचे गाव गाठली आणि तिची अखेरची भेट ती सरणावर असताना घेतली….. सारी स्वप्न त्या चितेत पेटघेत होती.. या नंतर किमान ७ दिवस या युवकाने कोणाला काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर तो ठीक झाला परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल अस वाटत असेल….. तो तिला विसरू शकेल ? अशी हि आपल्यातीलच एका युवकाची….. अधुरी एक कहाणी.. Amar
Posted on: Wed, 31 Jul 2013 15:53:08 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015