कालचाच वाघा बोर्डर वर - TopicsExpress



          

कालचाच वाघा बोर्डर वर घडलेला प्रसंग..... वाघा बोर्डरवर परेड झाल्यावर १० - १५ मिनिटांनी तिथला सगळा परिसर रिकामी करण्यात येतो... त्यावेळी भारताच्या गेटपासून मोजून दहा फुटांच्या अंतरावर फोटो काढण्यासाठी तोबा गर्दी होते आणि त्यांना आवरायला तिथल्या सुरक्षायंत्रणेची दमछाक होते. भारताच्या गेटपासून दूर २०० मीटरवर सुवर्ण जयंतीद्वार आहे आणि त्यावर आपला भारत देशाचा झेंडा त्याच्या खाली अगदी योग्य ठिकाणी मोहनदास करमचंद गांधी या इसमाचा हाराशिवाय फोटो आहे. नेमके तेच चित्र पाकिस्तान गेटच्या पलिकडे त्यांचा द्वारावर आहे फक्त तिकडे जिना (पायर्या नव्हे) या व्यक्तिचा चा फोटो हाराशिवाय आहे. तर काल सायंकाळी परेड आटपून सगळे लोक घरी परत असताना एक ६-७ वर्षांचा लहानग्या मुलाने तिथल्या तैनात सुरक्षारक्षकाला जिना या व्यक्तिच्या फोटोकडे बोट दाखवून विचारले who is this . तैनात फौजी जे उत्तर दिलं ते फक्त एका ओळीत आहे. ' बेट,he is mahatma gandhi of pakistan, like we have they also have and because of both of them those people are behind that gate and we are here with one line called border' त्याचं हे वाक्य मी माझ्यामरेपर्यंत तरी विसरणार नाही.... आता ज्याला जो अर्थ काढायचाय तो काढा.... ;-) :-D
Posted on: Mon, 08 Jul 2013 14:52:15 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015