कर्जे महाग होण्याची - TopicsExpress



          

कर्जे महाग होण्याची शक्यता; बॅंका नाराज - - सकाळ न्यूज नेटवर्क बुधवार, 17 जुलै 2013 - 02:00 AM IST Tags: reserve bank, rupee, dollar, inflation, foreign exchange, chidambaram, business, money, loan, repo rate बॅंकांसाठी पतपुरवठा दरात रिझर्व्ह बॅंकेकडून दोन टक्के वाढ केल्याचा परिणाम मुंबई - रिझर्व्ह बॅंकेकडून बऱ्याचदा बॅंका व्याजावर पैसा घेतात. बॅंकांच्या या पतपुरवठ्याच्या दरात (मार्जिनल स्टॅंडिंग फॅसिलिटी दर) रिझर्व्हबॅंकेने दोन टक्के वाढ करून हा दर8.25 टक्क्यांवरून 10.25 टक्के केला आहे. बाजारात खेळत्या पैशाचे प्रमाण कमी करून महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी पतधोरण आढाव्याआधीच हे पाऊल उचलले आहे. यामुळे बॅंकांच्या हातात कमी पैसा राहणार असून, याचा थेट परिणाम म्हणून कर्जे महाग होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे देशातील बॅंकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. रिझर्व्ह बॅंकेने या वेळी रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. बॅंकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रेपो दरापेक्षा मार्जिनल स्टॅंडिंग फॅसिलिटी दर तीन टक्केअधिक ठेवण्यात आला आहे. याची अंमलबजावणी तत्काळ होणार आहे. भारतीय रुपयाचे होणारे अवमूलन रोखण्यासाठी करण्यात आलेले सर्व उपाय कुचकामी ठरल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने वरील उपाय केल्याचे बॅंकेचे म्हणणे आहे. दरवाढ तात्पुरती असल्याचा बॅंकांचा दावा रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांच्या पतपुरवठा दरात केलेली दोन टक्के वाढ ही तात्पुरती असून, रुपयाचे अवमूलन थांबल्यावर ही दरवाढ मागेघेतली जाईल, असा विश्वास बहुतेक बॅंकांनी व्यक्त केला आहे. भारतीय स्टेट बॅंकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांच्या मते, हा उपाय दीर्घकाळ राहणार नाही. रुपया स्थिर झाला, की रिझर्व्ह बॅंक ही दरवाढ मागे घेईल. बॅंकांच्या कर्जांमध्ये किती वाढ किंवा घट होईल ते ही दरवाढ किती काळ राहते, त्यावर अवलंबून राहील; परंतु मुदत ठेवीदरावर याचा फारसा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. युको बॅंकेचे अध्यक्ष अरुण कौल यांनीही ही दरवाढ तात्पुरती असल्याचे सांगितले आहे
Posted on: Thu, 18 Jul 2013 10:18:35 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015