गड संवर्धन आणि पर्यटन - TopicsExpress



          

गड संवर्धन आणि पर्यटन विकासाच्या गोंडस नावाखाली गडांवर अगदी वरपर्यंत रस्ता-पायऱ्या-रोप वे करण्याचं एक नवीन फॅड आलंय...(रायगडावरची रोप वे, रायरेश्वरवर जाणारा रस्ता, तोरण्यावर होऊ घातलेला रस्ता यामुळे कसला विकास आणि संवर्धन झालंय) या रस्त्यांनी काय गड संवर्धन आणि पर्यटन विकास होणार आहे देव जाणे.... गडावर वरपर्यंत जायला रस्ता किंवा पायरया करायच्या असत्या तर त्या ज्यांनी गड बांधला त्यांनीच केल्या असत्या की, या रस्त्यांमुळे प्रचंड जंगलतोड आणि पेताड लोकांची अलगद वरपर्यंत जाण्याची सोय मात्र नक्की झालीय. खालून वरपर्यंत रस्ते-पायरया करून गडांचा मूळ ढाचा आपण बदलूच कसा शकतो...? गड - किल्ले म्हणजे लोणावळा-महाबळेश्वर आहेत काय...? गडावर फालतूपणाचा कळस गाठणारी छपरी गर्दी बघितली की सगळे किल्ले लिंगाण्यासारखे अवघड करून ठेवावेत असं वाटायला लागतं... ज्यांना खरंच जायचंय ते कसेही जातील... बाकीची पेताड माकडं खालून पाहत बसतील...
Posted on: Thu, 01 Aug 2013 04:10:10 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015