घसरता रुपया - TopicsExpress



          

घसरता रुपया सावरण्यासाठीचे "साधे" उपाय *********************************** १) दरमहा आपण फक्त एक लिटर पेट्रोल वाचवूया. * कसे तेही सांगतो. फार काही नाही. सुट्टीच्या दिवशी जवळच कुठे जायचे तर पायी किवा सार्वजनिक वाहतुकीने जावे. (०.३ लिटर बचत नक्की.) * पार्किंगमधेच गाडी चालू करून बाहेर काढण्या पेक्षा इमारती बाहेर आणून सुरु करू. (०.३ लिटर बचत नक्की.) * सिग्नल ला गाडी बंद ठेवू (०.१ लिटर बचत नक्की ) * रस्त्याने जाताना निष्कारण ब्रेकवर पाय दाबून ठेवल्याने इंधन जास्त जळते. तुम्ही पहा ना, अनेक गाडीचे ब्रेक लाईट कायम लागलेले असतात. गाडी तरी कडे avarage देणार? हि सवय टाळूया. (०.२ लिटर बचत नक्की.) * चाकात हवा वरचेवर चेक करावी. कमी हवेमुळे इंधन जास्त जळते. पाच रुपयाच्या हवेतून किमान दहा चे इंधन वाचेल. (०.२ लिटर बचत नक्की.) *** अशी एकूण एक लिटर बचत नक्की होईल. महिना सुमारे ७० रु. धरा. -------------------- २) विदेशी टूथ पेस्ट बंद करून स्वदेशी पेस्ट एक महिना वापरून पहा. नाही रुचले तर पुन्हा नेहमीची तुमची वापरा. पण त्या एक महिन्यात तरी स्वदेशी पेस्ट वापरल्याने विदेशात जाणारा पैसा वाचेल. एक पेस्ट सुमारे चाळीस रुपयाची, एका कुटुंबाला एक पेस्ट लागते, तरी यातून स्वदेशी वापरली तर किमान दहा रुपये वाचतील. ---------------------- हे साधे दोन उपाय आहेत. पण यातून किती मोठे काम उभे राहू शकते पहा. ***************** होणारी बचत : इंधन ७० रु. + पेस्ट १० रु. = ८० रु. माझ्या एफ बी यादीत ५००० मित्र + ५००० फोलोअर्स आहेत. = १०,००० झाले. १०,००० x ८० रु. = ८ लाख रु. ******************* आता यात या मित्रांचे मित्र (फ्रेंड्स ऑफ फ्रेंड) मिसळले तर....???? ---------------------- १०००० मित्र x प्रत्येकाचे किमान ३०० मित्र = ३० लाख मित्र होतात. ३० लाख x ८ लाख रु. = २४० लाख रु. होतात. * म्हणजे किमान महिना सुमारे २४० लाख रुपये केवळ इथे डीडी चे मित्रमंडळी वाचवू शकतात. कल्पना करा... किती मोठे काम होईल हे !! सगळ्या गोष्टी सरकारने कराव्या असे म्हणून केवळ टीका करीत बसण्या पेक्षा आपल्या परीने आपण एक पाऊल पुढे टाकू !! **** इंधन आणि पेस्ट मधून इतके काम होतेय.. यात तुम्ही अजून कोल्ड्रिंक, लिपस्टिक, पिझ्झा अशा विविध वस्तू add करू शकता !! उगीच वाद घालण्यापेक्षा.....पहा विचार करा.....
Posted on: Tue, 03 Sep 2013 17:26:22 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015