छ.शिवराय...ते मराठा,हिंदू - TopicsExpress



          

छ.शिवराय...ते मराठा,हिंदू असल्यामुळे ग्रेट ठरत नाहीत तर "स्वराज्याची" उभारणी करून हे स्वराज्य,सर्वजाती धर्माच्या लोकांच्या कल्याणासाठी असून सहिष्णूता तत्वावर ते या राज्याची उभारणी करतात... म्हणून ते ग्रेट ठरतात..मध्ययुगात ऎषोआराम आणि स्थापत्यावर कोट्यावधी रूपये खर्च करणारे आपले मुगल शासक आपल्याला माहित आहेत, तशी संपत्ती खर्च न करता स्वराज्याचे संरक्षण करणार्यासाठी गड किल्ल्यांवर संपत्ती खर्च करणारा असा हा शासक विराळाच....मराठा इतिहासात 19 व्या व 20 व्या शतकात...ज्यांनी लेखन करून योगदान दिले त्यात डफ,रानडे,राजवाडे, सरकार, शेजवलकर यांचे महत्वाचे योगदान आहे.. राजवाडे तर संशोधनातला बाप माणूसच...या लेखनात ही मर्यादा होत्याच. सत्यशोधक चळवळीत स्वःता फुलेंचा राजांबद्दलचा पोवडा,अथवा त्यांचे सहकारी केळूस्करांचे शिवचरित्र महत्वाचे आहे.... पण त्यानंतर, बाबासाहेब पुरंदरेनी,संशोधन करून (?) इतिहास विकृत पद्धतीने मांडून राजा शिवछत्रपती ग्रंथ लिहला,बक्कळ प्रसिद्धी आणि अन्य काही बाबी कमावल्या...पुरंदरेनी दूर दुर महाराष्ट्रात छ.शिवाजीचे नाव पोहचवले असं मला नाही वाटतं...कारण पुरंदरे जन्माला येण्यापूर्वीच महाराष्ट्रातल्या काही अन्य धर्मीयांचा अपवाद वगळता महाराष्र्टातील प्रत्येक घरात असणारे शहाजी, संभाजी, तानाजी,शिवाजी हे नाव मराठ्यांच्या इतिहासाचा प्रभाव दाखवून देते....हा इतिहास आपल्या रक्तात त्यामुळे उतरला आहे असं मला वाटतं...पुरंदरेंच लेखन विकृत यासाठी की स्वःता महाराज मुस्लीमद्वेष्टे आहेत,आणि सर्व मुस्लीम शासकांनी इथं फक्त लूटमार, बलात्कार केले असं ते चित्रण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या लेखनात केलं आहे...जेम्स लेन प्रकरण मला यासाठी महत्वाचं वाटतं की छ.शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणारे, राजकारण करणारे कोण,गल्ला भरणारे कोण? हे यानंतर स्पष्ट होत गेलं.. आणि महाराष्ट्रातील नव्यापिढीनं नव्या दृष्टीने छ. शिवाजी समजून घ्यायला सुरवात केली.....त्यात पानसरेंची लोकवांङमयने काढलेली छोटी पुस्तिका,नव्या पिढीतले लेखक,व्याख्याते यांचे योगदान महत्वाचे आहे. या सर्वांनी एक कल्याणकारी राजा,एक माणूस म्हणून महाराजांकडे बघण्याचा केलेला प्रयत्न.. महाराजांच्या सभोवती असणारं दैवी वलय बाजूला सारून एक माणूस त्यांच चित्रण करण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच उल्लेखनिय ठरतोय...कोल्हापूरातून असं लेखन करणारे इंद्रजीत सावंतांसारखे संशोधक नव्याने येणार्या महाराष्र्टासाठी,अभ्यासू पिढीचे अश्वासक प्रतिनीधत्व करतात...## मध्ययुगात लोकशाही संस्थांचा भारतात तरी विकास झालेला नव्हता,धर्म ही बाब जीवनाच्या सर्वक्षेत्रात प्रभाव टाकणारी होती..अशा काळात सत्तेला सामाजिक अधिमान्याता घेण्यासाठी..शासकांभोवती दैवी वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाई...मुगलांच्यात आढळणारी झरोका दर्शन पद्धती हे त्याचेच एक उदाहरण होते...आणि या दैवी वलय निर्माण करण्यात कथा,दंतकथा,अफवा भर घालायाच्या.. छ.शिवरायांच्या भवानी तलवारी बाबतच्या कथा,दंतकथा अशाच सामाजिक अधिमान्यता निर्माण करण्याचे प्रयत्न असावेत...या तलवारीवर इंद्रजितने संशोधन करून केलेले लहानसे लेखन अप्रतिम आहे. असंच लेखन भूतकाळला साकल्याने समजून घेण्यासाठी महत्वाचे ठरत जाणार आहे.. "महानायक" पातळीवरून राजांसारख्या व्यक्तीमत्वाला "माणूस" पातळीवर आणणारे हे लेखन आहे...एक दैवी शासक आणि सामान्य जनता यांच्यात असणारी अलिखीत दरी हे लेखन कमी करणारे आहे..राजे हे आपल्या सारखेच हाडामांसाचे होते,एक सर्वांचे कल्याण होईल असं राज्य आपल्याला उभारायचं आहे, हे स्वप्न पाहणं,ते स्वप्न इथल्या सामान्य माणसात,मातीत खोलवर रूजवनं आणि तसं "स्वराज्य" सत्यात उतरवणं...एक सामान्य व्यक्ती आपल्या दृष्टी,प्रयत्नातून काय करु शकते,आणि आपण ही आपलं आयुष्य तसं घडवू शकतो हा विश्वास,राजांकडे या "माणूस" म्हणून बघण्यातून मिळतो.....माणूस म्हणून बघण्याने त्या व्यक्तीच्या मर्यादा पण आपणास समजत जातात.. आणि वाचकाचा विचारांचा प्रवास एक समतोल दृष्टीकोन तयार होण्याकडे होतो आणि तो ही त्या व्यक्तीबाबत असणारा कोणताही आदर कमी न होता...## इतिहासाबाबत असं म्हणतात, की इतिहास सत्य असत नाही;तर गतकाळातील सत्यापर्यंत इतिहास जायचा प्रयत्न करतो..आणि सत्य हे नेहमी बदलणारे असते.त्यामुळे अंतिम सत्य,अंतिम इतिहास असं काही असतं नाही.तसं असत तर कोणत्याही इतिहासातील कालखंडावर एकच पुस्तक लिहून तो इतिहासं,लिहणं तिथंच थांबल असत.आणि दुसरी तेवढीच महत्वाची बाब ई.एच. कार असं म्हणतो की,Read Historian,Before Reading His/Her History...हे समजलं तर मग आणखीच मजा आहे.. :)
Posted on: Sat, 05 Oct 2013 02:35:14 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015