जननी सुरक्षा योजनेची - TopicsExpress



          

जननी सुरक्षा योजनेची माहिती जननी सुरक्षा योजना केंद्रशासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत २००५-०६ या वर्षी सुरु केली आहे. राज्याने शासन निर्णय क्र. जसुयो २००५/६७०/प्र.क्र.१७१/कु.क. ३ दिनांक २६/१०/२००५ अन्वये या योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली. त्यानुसार प्रथम ग्रामीण भागात ही योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय क्र. जसुयो २००५/६७०/प्र.क्र.१७१/कु.क. ३ दिनांक १४/०८/२००६ अन्वये ही योजना नागरी भागात नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात अंमलबजावणीस मंजूरी दिली. या योजनेत दारिद्रय रेषेखालील मातांना लाभ देण्यात येतो. शासन परिपत्रक क्र. जसुयो २००६/प्र.क्र.१७५/कु.क. ३ दिनांक २२/१२/२००६ अन्वये या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात व शहरी भागातील अनुसूचित जाती व जमातीच्या गर्भवती मातांनाही आर्थिक लाभ देण्यास मान्यता दिली आहे. योजनेचे उद्दिष्टः- राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील (मुख्यतः चाळी, झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती इत्यादी) दारिद्रय रेषेखालील व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणा-या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे असे आहे. लाभार्थी पात्रताः- दारिद्रय रेषेखालील सर्व लाभार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती माता (दारिद्रय रेषेखाली नसलेल्या देखील) सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी १९ वर्षे असावे. सदर योजनेचा लाभ २ जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील. योजनेअंतर्गत लाभार्थीस दिला जाणारा लाभः- प्रसुती घरी झाली तर रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) एवढा लाभ लाभार्थींना देय राहतो. शहरी भागातील रहिवासी लाभार्थीस संस्थेत प्रसुती झाल्यानंतर रु. ६००/- प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देण्यात येतात. ग्रामीण भागातील रहिवासी लाभार्थीस संस्थेत प्रसुती झाल्यानंतर रु. ७००/- प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देण्यात येतात. सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस रु. १५००/- चा लाभ देण्यात येतो. https://docs.google/document/d/18OF4k5TucOJzazmSIths4eFU9BAROzrR7E9X1I0MweY/edit?hl=en_US&pli=1 वरील लाभ हा धनादेशाद्वारे देण्यात येतो. hindi.indiawaterportal.org/node/35872 https://docs.google/document/d/18OF4k5TucOJzazmSIths4eFU9BAROzrR7E9X1I0MweY/edit?hl=en_US&pli=1 उपकेंद्रस्तरावर जननी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य सेविकांच्या नावे सब-अकाउंट उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच सदर अकाऊंट मधून लाभार्थींना लाभ देण्याच्या धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार आरोग्य सेविका यांना देण्यात आलेले आहेत. सेवा केंद्रेः- सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका-नगरपालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, शासनमान्य खाजगी रुग्णालये या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात येतो. जननी सुरक्षा योजने अंतर्गत् “आशा” कार्यकर्तीने लाभार्थीस आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्यास आदिवासी व बिगरआदिवासी कार्य क्षेत्रातील “आशा” कार्यकर्तीस अनुक्रमे रु. ६००/- व रु. २००/- देय आहे. जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थींची माहिती
Posted on: Thu, 06 Jun 2013 12:10:56 +0000

© 2015