जुन्या खानदेश परिसरात - TopicsExpress



          

जुन्या खानदेश परिसरात म्हणजे अजिंठ्याचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी या खोल खाणी-खदाणीत वास्तव्यास असलेले अहिर लोक अहिराणी बोलत[,खानदेश परिसरातील अहिरांच्या वास्तव्यामुळे, सत्तेतील त्यांच्या प्राबल्यामुळे, त्या परिसरतील सर्वांच्या बोलीवर अहिराणी बोलीची छाप पडली. यातून खानदेशाचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद झाले आहेत. प्रदेशानुसार बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी हे बोलीभाषांतील प्रादेशिक प्रभेदांत, तर जातिवाचक बोली ह्या सामाजिक प्रभेदांत मोडतात. खानदेशातील सर्व जातींची बोली ही अहिराणीची छाप असणारी बोली आहे. या सामाजिक प्रभेदांत महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, इत्यादी सामाजिक प्रभेदाच्या बोली आहेत. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी, असे असल्याने खानदेशी ही संकल्पना अहिराणी ह्या संकल्पनेहून विशाल आहे. जवळपास ९५% टक्के खानदेशी माणसे अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, बागलाण ह्या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे.गुजरातच्या, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या खेतिया, पानसेमल, संधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात.
Posted on: Wed, 25 Sep 2013 00:34:32 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015