झंप्या मोबाईल कंपनीच्या - TopicsExpress



          

झंप्या मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करतो.. एक मुलगी फोन उचलते.. मुलगी : कस्टमर केअर मध्ये आपलं स्वागत आहे.. मी आपली काय मदत करू शकते ? झंप्या : तुम्ही माझ्याशी लग्न कराल ? मुलगी : तुम्ही चुकीचा नंबर डायल केला आहे झंप्या : नाही, मी बरोबर नंबर लावला आहे, तुम्ही माझ्याशी लग्न कराल ? मुलगी : नाही, मी लग्नात इंट्रेस्टेड नाही झंप्या : मॅडम, ऐकून तर घ्या एकदा मुलगी : नाही.. नाही.. सॉरी झंप्या : लव्ह मेरेज कराल तर हनीमून SWITZERLAND मध्ये आणि अरेंज मेरेज तर PARIS ला मुलगी : मला तुमच्याशी लग्न करण्यात काही इंट्रेस्ट नाही, तुम्ही मला का ऑंफर देत आहात झंप्या : मॅडम, आता तुम्हाला समजलं असेल आमचं दुखः, आम्हाला तुमच्या ऑंफर मध्ये कुठलाही इंट्रेस्ट नसतानाही तुम्ही आम्हाला सारख सारख फोन करून का त्रास देतात.
Posted on: Tue, 12 Nov 2013 08:01:37 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015