नमस्कार!मी वैभव - TopicsExpress



          

नमस्कार!मी वैभव इंगळे.तसे पाहिले तर माझा या भुता खेतांच्या गोष्टी ऐकायला,वाचायला आवडायचा पण विश्वास नव्हता.पण आज जो माझा अनुभव मी तुमच्यासमोर मांडणार आहे त्याने तर मला पण सुध्दा या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास बाध्य केले आहे.आपल्याला हे चांगलच ठाऊक आहे कि भुतांचा वास मोठमोठाली झाडांवर असतं.त्यात महत्त्वाची झाडे म्हणजे वडाचं,चिंचेचं,आंब्याचं.आता जास्तं बडबड न करता कथेला सुरूवात करतो.मी राहणारा मुळ अमरावतीचा.माझ्या घराजवळ एक ब्रिटिश कालीन महाविद्यालय आहे.आधी तिथे ब्रिटिश सैनिकांचे हेडक्वार्टर होते.त्यानंतर तिथे सन १९१२ ला या महाविद्यालयाची स्थापना झाली.व्ही.एम.व्ही.कॉलेज अमरावती,हे नाव.हे महाविद्यालय ३०० एकड च्या क्षेत्रफळ मध्ये फैलले आहे.तिथे हॉस्टल पण आहे.पण त्या महाविद्यालयात कोणी पण रात्री ९:३० च्या दरम्यान फिरकत नाही.चुकून सुध्दा नाही.कारण अशी लोकमान्यता आहे कि तिथे अशा चित्र विचित्र घटना घडतात कि आपण त्यांचा अंदाज सुध्दा लावू शकत नाही.आता मुद्यावर येतो.माझी ट्युशन रात्री पर्यँत संपायची,जवळपास १० वाजेपर्यंत.मी आपल्या साईकल ने ये-जा करायचो.माझ्या घरा कडे जायला एक शॉर्टकट रस्ता आहे आणि तो पण कॉलेज मधुन जातो.जास्त भीड नसते तिथे पण जसे कि आधीच सांगितले आहे रात्री तिथे कोणीच फिरकत नाही.असेच एक दिवस मी माझी ट्युशन करून घरी येण्यास निघालो.आता मला तिथून निघतानी १०:०६ वाजले.आता घरी लवकर पोचण्याच्या बेताने मी त्या कॉलेज मधुन जाणारा शॉर्टकट रस्ता निवडला.वेळ पण खुप झाला होता म्हणुन.तिथे माझ्या शिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं,म्हणजे रस्ता पुर्ण रिकामा.मग काय मस्तं वेगाने नेली आपली साईकल.विचार करत करत आरामशीर आपलं चाललो होतो तिथून.आता कॉलेज परिसर म्हटलं कि तिथे झाड येणारच नाही का!तिथे पण होते.आता तुमच्यापैकि जो अमरावतीचा असेल त्यांना हे माहितंच असेल कि त्या कॉलेज मध्ये पोपुलर नावाचं पण एक भलं मोठं झाड आहे.तर मी आपलं विचार करत करत आपली साईकल त्या रिकाम्या रस्त्यावर पळवत.तेव्हा असे वाटत होते कि जणु काय आज या रस्त्यावर आपलाच राज आहे.कोणीच तिथे अडवणारं नाही.सगळीकडे शांतता.बिंधास्तं!आता थोड्याच कॉलेज परिसर जवळ आलं.माझी साईकल आता मला तिकडे आणखी जवळ जवळ नेऊ लागली.थोड्याच वेळात मी कॉलेजच्या परिसरात होतो.आता जरा वेगळंच वाटत होतं.थोड्याच अंतरावर तिथे पोपुलर चं झाड होतं.जो पर्यंत तिथे पोचलो नाही तोपर्यँत सगळं काही सुरळीत होतं.पण जसा मी त्या झाडाच्या बाजू ने गेलो तसाच मला तिथे एकाएकी गारवा वाटला.ठिक आहे म्हटलं आता झाड म्हटलं कि थोडं थंड वाटतेच म्हणुन काही विचार नाही केला.अरे!त्याच्या नंतर आता साईकलची चेन पण पडली.श्श्य्य्या!आता या चेन ला पडायला काय झालं कोणास ठाऊक!मला अशा जागी आता चेन लावणे काही बरोबर नाही वाटले.म्हणुन आता तिला पैदलंच नेले.आता थोडं अंतर कापतोच कि अचानकच कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला.ह्य्यां!कॉलेज परिसरात कुत्रा!आता पर्यँत एक आवाज नाही आणि आता हा कुत्रा!त्याच्या आवाजामुळे मी तिथे दचकुन थांबलो.कुत्रा इथे कसा काय या विचाराने मी आपला मोबाइल टॉर्च सुरु करून चारही बाजूचा सुगावा घेतला.काहीच नाही दिसलं.म्हणुन मग मी आपला मोबाइल परत ठेवायला लागलो तर पुन्हा त्याच कुत्र्याचा आवाज.अरे!काय नाटक आहे यार.आताच पाहिलं तर कुणीच नाही आणि दुसर्याच क्षणी पुन्हा कुत्र्याचा आवाज,आणि त्यात म्हणजे अंधार पण होता.मी पुन्हा आपल्या मोबाइलचा टॉर्च फिरवला.या वेळेस आता मला कसली तरी आकृती दिसली.भली मोठी होती ती.आता ती आकृती माणसाची होती कि बाईची ते काही समजलं नाही.पण टॉर्चच्या उजेडात फक्त मला एवढं दिसलं कि त्याचे लांब लांब केस होते व तो कुत्र्याला त्याच्या नळ्यापासून पाडून आला होता.हा काय प्रकार आहे,इतक्या रात्री ते पण कॉलेज परिसरात.मला विचार आला आणि उत्सुकते पायी मी त्याला आवाज दिला-ऐँ ऐँ कोण आहे तिकडे आणि काय चालू आहे रे?पण काहीच प्रतिसाद नाही.मी परत विचारले.काहीच प्रत्युत्तर नाही.मी पुन्हा पुन्हा प्रश्न केला तरी पण तेच!आता मी टॉर्चच्या उजेडा च्या सहाय्याने त्या आकृती कडे गेलो.माझी विचारपुस सुरूच होती.जवळ गेलो आणि आता वैतागुन विचारलंकाय रे मी किती वेळापासून तुला विचारतोय,कोण आहेस आणि काय चालू आहे.तर तु काही बोलतच नाही आहेस.मुका आहेस कि ऐकू नाही येत.मी त्या आकृतीच्या खांद्याला हलवत म्हणालो.आता शांतताच होती.मी पुन्हा तोच प्रश्न केला.आम्ही तिथे तसेच उभे होतो.कुत्रं पण भुंकणे बंद झालं होतं.असेच काही वेळ आम्ही शांत उभे होतो.आता ती आकृती काही न बोलता माझ्याकडे वळली.आपला टॉर्च चा उजेड मी तिच्या चेहर्यावर मारला.आणि जे काही बघितलं ते पाहून तर आता माझी चांगलीच फाटली.तिचा चेहरा खुप भयानक होता खुपच.माझे डोळे एकदम फाटले.माझं शरिर आता एकदम सुन्न झालं.काय करू कसा पळू काहीच सुचत नव्हतं.मी थरथरत होतो.विचार कराची सुध्दा शक्ती गेली तेव्हा माझी.अचानकच त्या बाईने जोरात बैलासारखा आवाज केला.मी दचकुन ओरडत जमिनी वर तिथेच पडलो.ती बाई अजून जोरात ओरडली.त्या भयाण शांततेत तो आवाज खुप भयावह वाटत होता.ती माझ्या अंगावर येणारच कि तिथू बाजुला वळून पटकन कसा बसा उठलो आणि धावत सुटलो.ती बाई पण माझ्या मागे धावत सुटली.माझ्यात आणि साइकल मध्ये फारसा अंतर नव्हता पण त्या भय मुळे तो अंतर सुध्दा आता खुप जास्तं वाटू लागला.धावता धावता माझा पाय मोडला आणि मी पुन्हा जमिनीवर आढळलो.ती बाई आता माझ्या जवळ आली आणि माझा पाय खेचू लागली पण मी आपल्या पुर्ण ताकदिने आपल्या दुसर्या पायाने तिला जोरदार धक्का दिला आणि कसा बसा उठून परत धावत सुटलो.न माझा पाय साइकल च्या मागच्या चक्या मध्ये फसला.मी तो काढायचा प्रयत्न करत होतो आणि तिकडे ती बाई माझ्याकडे धावत येत होती.मी खुप घाबरलो होतो आणि त्यामुळे मी खुप थरथरत पण होतो,पण माझा प्रयत्न चालूच होता.ती बाई जवळ जवळ येत होती आणि मी माझा पाय काढत होतो.ती बाई आता एकदम जवळ आली आणि माझा पाय पण चक्यातून निघाला आणि ती मला धरणारच कि मी तिथून पळालो. आपला जीव मुठीत धरून मी वेगाने पळत होतो.आणि ती बाई पण माझ्या मागे होती.मी पुढे ती मागे.ती आता हळू हळू माझ्या जवळ आली,आणखी जवळ आणखी जवळ.आता मला मेन रोड दिसायला लागला होता.आणि मी अजून आपला वेग वाढवला.ती बाई आता माझ्या खुप जवळ आली होती.आता तिने माझा कॉलर पकडला..........पण मी थांबलो नाही.आपल्या पुर्ण ताकदिने मी तिला विरोध करत धावलो आणि थोड्याच वेळात...........तिच्या हातून माझा कॉलर सुटला,कारण मी कॉलेज परिसर पार करून मेन रोड वर आलो होतो. शेवटी मी सुखरूप घरी पोचलो.
Posted on: Thu, 14 Nov 2013 17:17:33 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015