नेट-प्रेम - TopicsExpress



          

नेट-प्रेम भाग-२१ मंग्याची सगळीकडे धावपळ सुरु होती. घरात एकंदरीत सगळेच घाईत दिसत होते. मंग्या एकसारखा सगळ्यांना सूचना देत होता," पटकन आवरा यार तुम्ही सगळे, मला तिकडे जाऊन श्रीच्या बाजूने पण, उभं राहायचं आहे." शेवटी वैतागून तो श्रेयाच्या खोलीत जाऊ लागला, तितक्यात श्रेयाची आई डोळे पुसत बाहेर आल्या, त्यांच्या पाठी वाहिनी पण, मग चांडाळ्या . तसा तो टोमणा मारत म्हणाला," बर झालं, दादा आणि काका पुढे गेलेत नाही तर आताच रडारड करून तुम्ही गोंधळ घातला असता, (तश्या सगळ्या बायकांचा रागीट चेहरा वरती उठला) अरे! म्हणजे आताच मेकअप केलाय ना तुम्ही सगळ्यांनी, खराब होईल ना तो, आणि मग श्रेयाला रडवू नका म्हणजे झालं!!" तितक्यात काकू बोलल्या,"मुलगी होऊ दे तुला मग कळेल तुला, काळजाचा तुकडा लग्न करून जाताना कसं होत ते." कान पकडत मंग्या म्हणाला,"सॉरी काकू!! पण आता निघायला हव, मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, आपल्याला निघायला हवं, श्रेयाचं झालं आहे कि नाही?" तितक्यात श्रेया बाहेर आली, "चला, लवकर श्री माझी वाट पाहत असेल." हे ऐकताच सगळ्यांना हसू फुटलं. होणाऱ्या वधूला घेऊन सगळे गाडीत बसले, ते "शुभमंगल" कार्यालयाकडे जाण्याकरता. श्रेया खूपच सुंदर दिसत होती, अगदी नववधू बाहुली सारखी. गेल्या तीन वर्षापासून ती ज्या क्षणाची वाट पाहत होती, तो क्षण आज घडणार होता. आज ती श्रीची होणार होती, दोघे मनाने कधीच एकं झाले होते, पण आज ते दोघे "विवाह" नावाच्या बंधनात बांधले जाणार होते. श्रेयाला प्रत्येक सेकंद तासासारखा भासत होता. आयुष्यातलं भयानक स्वप्न कायमच विसरून, तिने एल.एल.बी. पूर्ण केलं. प्रत्येक पावलावर श्री तिची सावली बनून वावरत होता. त्याचं प्रेम, त्यांची पहिली भेट, श्रीची तगमग, श्रीने लग्नासाठी विचारलेला तो बेधुंद क्षण, तिच्या होकारात, तिला उचलून वेडा झालेला श्री आठवून ती गालातल्या गालात लाजली. हे पाहताच, वहिनीनी विचारलं, "आज कोणीतरी गालातल्या गालात हळूच लाजतंय, काय श्रेया! बरोबर ना ? यावर लाजून चूर होऊन श्रेया म्हणाली, "काय ग! वहिनी गप्प न आता, किती छळशील मला आता?" यावर टोला मारत वहिनी म्हणाल्या,"आम्ही थोडीच छळणार आता, तो हक्क तर श्रीचा!" यावर सगळ्यांचा हशा पिकला. लाजेने चूर होऊन श्रेया गप्पं झाली, ते पुन्हा श्रीच्या विचारांत रमण्याकरता. प्रत्येक विचारागनिक तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते. श्री कसा दिसत असेल? त्याला आवडेल ना माझा मेकअप, आधीच त्याला मेकअप आवडतं नाही, आधी ट्रायल मध्ये तर तो नाक मुरडत होता, कोण जाणे आता त्याला आवडेल कि नाही? आवडेलच? अहं!! प्लिज प्लिज देवा मला पाहताच तो ती वाली स्माईल देऊ दे, म्हणजे मला कळेल कि मी छान दिसतेय! श्री तर आहेच सुंदर, त्याच्या समोर सुंदर दिसायला थोडा मेकअप करावाच लागणार ना! त्याच्या सुंदर मनासमोर तर मी काहीच नाही, तो आहेच असा! टचवूड!!! माझे तर हात थंड पडलेत, आता काय होणार! श्री कधी पाहणार मी तुला? अहं!! एक दिवस नाही पहिलय तर अशी अवस्था आहे माझी, तुझीपण काही वेगळी नसणार माहितेय मला. कधी एकदा अंतरपाठ होईल असं झालंय मला!! विचारांचा अतिरेक सहन करत तिने आईची कुशी गाठली, आईला मिठ्ठी मारून जणू सगळे विचार शांत होत गेले. अर्थात थोड्या वेळासाठी. शेवटी वैतागून तिने विचारलं, "अजून किती वेळ लागणार पोहचायला मंग्या?" तिला झालेला उतावळेपणा पाहून पुन्हा सर्वाना हसू फुटलं. दुरून "शुभमंगल" कार्यालयाचा फलक पाहून तिच्या चेहऱ्यावरची खळी फुलली. For further reading please visit, kahimanatale-priyashree.blogspot.in/2013/07/blog-post_6130.html
Posted on: Wed, 24 Jul 2013 23:41:12 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015