*परवा भेटला बाप्पा, जरा - TopicsExpress



          

*परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला* *दोन क्षण दम खातो, म्हणून माझ्या घरी टेकला* *उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला* *मी म्हटले सोडून दे, आराम करू दे त्याला* *तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?* *मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?* *मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक* *तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक* *इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो* *भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो* *काय करू आता माझ्याने manage होत नाही* *पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत* *immigration च्या requests ने system झालीये hang* *तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग* *चार-आठ आणे देऊन काय काय मागतात* *माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात* *माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation* *management च्या theory मध्ये मिळेल तुला solution* *M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?* *Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?* *असं कर बाप्पा एक Call Center टाक* *तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक* *बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको* *परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको* *माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला* *एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला* *CEO ची position, Townhouse ची ownership* *immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship* *मी हसलो उगाच, म्हटलं खरंच देशील का सांग?* *अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?* *पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं* *सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं* *हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव* *प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव* *देशील आणून मला माझी हरवलेली नाती?* *नेशील मला परत जिथे आहे माझी माती?* *इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं* *आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?* *कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार* *भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार* *यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान* *देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?* *तथास्तु म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय पोरा, सुखी रहा म्हणाला......* 😇Rohit....
Posted on: Tue, 03 Dec 2013 08:06:30 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015