प्रत्येक राज्यातील - TopicsExpress



          

प्रत्येक राज्यातील स्थानिक भाषेला प्राथमिकता हि मिळालीच पाहिजे. परंतू आपल्या महाराष्ट्रात हे अभावानेच आढळते. म्हणजेच बघा ना आपल्याकडे ४ मराठी लोकं बोलत असतील आणि त्यात जर १ अमराठी माणूस आला तर सगळेच हिंदी भाषेत बोलतात, पण जर ४ अमराठी बोलत असतील आणि त्यात जर १ मराठी माणूस आला तर ती ४ अमराठी लोकं मराठी भाषेत बिलकुल बोलत नाहीत. उलट त्या १का मराठी माणसाकडे दुर्लक्ष्य करतात / कमी लेखतात. ह्या गोष्टीला काही अंशी मराठी माणूसच कारणीभूत आहे. कारण काहींना मराठी बोलायचीच लाज वाटते. काहींना English / Convent Medium मूळे मराठी भाषाच येत नाही. काहींना वाटतं समोरच्याला मराठी येत नाही म्हणून आपणच हिंदी / English बोलायला सुरु करू. English हि फक्त व्यवहाराची भाषा आहे, ती येते किंवा येत नाही म्हणून समोरच्याची गुणवत्ता ठरवणे हे योग्य नाही. परंतु जर व्यक्तीला स्वतःची मातृभाषा / स्थानिक भाषा येत नसेल तर मग मात्र त्याची गुणवत्ता ठरवणे योग्यच आहे. ती व्यक्ती काय लायकीची आहे समोरच्याने समजून घ्यायला पाहिजे. हि परिस्थिती आता खरच बदलायला पाहिजे नाहीतर आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्या फोटोला उलटं टांगून त्यावर हार, फुलं उधळायला देखील कमी करणार नाहीत. मराठी माणसाने जर मराठी भाषेला पर्याय शोधला तर मराठी माणसाला पर्याय उरणार नाही.... जय हिंदु जय मराठी
Posted on: Thu, 07 Nov 2013 09:49:22 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015