फेसबुक जरूर वापरा.. पण आधी - TopicsExpress



          

फेसबुक जरूर वापरा.. पण आधी वाचा हे जरा... ***************************** फेसबुकवर आपण दिवसातला बराच वेळ घालवतो. बरच काही शेअर करतो ज्यात कित्येकदा आपली Personal Information पण असते . तर इतक्या दिवसांत मला कळलेले आणि General Observation वरून लक्षात आलेले काही सुरक्षिततेचे नियम इथे नमूद करीत आहे . हे नियम जर आपण पाळले तर खर्या अर्थाने safe browsing (in fact safe facebooking ) करता येईल. १) फेसबुकच्या नवीन नियमानुसार जेव्हा पण तुम्ही प्रोफ़ाइल फोटो चेंज करता, तो पब्लिकलि शेअर होतो. तेव्हा आपण हेच समजत असतो कि आपले सगळे अल्बम आपण फ्रेंड्स ओन्ली करून ठेवले आहेत. पण सगळ्या नवीन फोटोजना तुम्हाला शेअरिंग ऑप्शन स्वतः फ्रेंड्स ओन्ली चेंज करावं लागतं . २) आपले स्वतःचे किंवा familyचे फोटोज कधीही पब्लिकलि शेअर करू नका.सर्व पर्सनल अल्बम फ्रेंड्स ओन्ली म्हणूनच शेअर करा. फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स पण नको. ३) आपला कव्हर फोटो सदैव पब्लिक शेअर असणार आहे. त्याची privacy setting आपल्याला चेंज करता येत नाही . म्हणून कव्हर फोटोमध्ये कधीही आपला किंवा आपल्या familyचा फोटो किंवा खाजगी फोटो टाकू नये. ४) आपलं स्टेट्स अपडेट करताना कधीहीकुठल्याही फेमस राजकारण्याच नाव पूर्ण लिहायचं टाळा . राजकारण्याच ह्यासाठी कि हीच ती लोक आहेत जी तुमच्या स्टेट्सवरून पण तुम्हाला अटक करवू शकतात . पूर्ण नाव टाळायच म्हणजे काय करायचं ? त्या नावाच्या मध्ये एखाद्या अक्षराऐवजी * टाका. (उदा. मन *** सिंग) ५) आपला पत्ता, मोबाइल नंबर कधीही प्रोफ़ाइलवर शेअर करू नका. ह्या गोष्टीचा मी स्वतः खूप वाईट अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतोय. ६) मोबाइल नंबर त्यांनाच द्या जे तुमच्या "चांगले मित्र" ह्या यादीत बसतात. विशेषतः महिलांनी ह्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. ७) कुठलीही फ्रेंड रिक्वेस्ट accept करताना निट पारखूनच accept करावी. काही parameters ज्यावर तुम्ही verify करू शकता. पहिलं म्हणजे किती म्युचुअल फ्रेंड्स आहेत. फोटो खरा लावलाय कि फेक , इंफोरमेशन खरी दिलेली आहे कि नाही प्रोफ़ाइलवर. आणि जर कुठले फोटो शेअर असतीलच पब्लिकलि , तर त्यावरच्या कॉमेंट्स काय आहेत? जर Maximum कॉमेंट्स wow , you look nice , is that your real photo वगैरे टाइप्स असतील तर समजून जा कि हे फेक प्रोफ़ाइल आहे. Chandrajit @@ @@@
Posted on: Thu, 03 Oct 2013 03:32:00 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015