मित्रानो मी आज तुमच्या - TopicsExpress



          

मित्रानो मी आज तुमच्या बरोबर औरंगाबाद pattern share करणार आहे,हे एका फोटोग्राफरच्या कार्यपद्धतीला मी दिलेले नाव आहे. दोन वर्षा पुर्वी मी औरंगाबाद येथे १९ ऑगस्ट म्हणजेच जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करायला गेलो होतो.आदल्या दिवशी रात्री जेवताना तेथील photographers आपापला परीचय करून देत होते. तेथे आनंद काळे नावाचा व्यवसाय बंधू खूप मोठे तत्वज्ञान(philosophy)सांगता झाला. आनंदनी त्याचे नाव सांगितल्यावर मी त्याला काय कॅमेरा आणि flash वापरतोस म्हणून विचारले,त्याचे उत्तर होते D 90 आणि बिल्ट इन flash.कॅमेराला मी तेवढे महत्व देत नाही पण direct flash तो पण बिल्ट इन flash=म्हणजेच flat photography,म्हणून त्याच्या बरोबर संभाषण वाढवण्याचा माझा मानस पण संपला. त्याच क्षणी त्याचाच एक मित्र मला म्हणाला सर आनंद बद्धल थोडी दुसरी पण माहिती सांगतो,ती पुढील प्रमाणे- आनंदने भारतातील बरीचशी प्रेक्षणीय स्थळे आपल्या कुटुंबासह स्वखर्चाने बघितली आहेत तसेच व्यवसाय निमित्त 4 foreign trip त्यातीलच एक सहकुटुंब, हे ऐकल्यावर मला आनंद सर्वात वेगळा भासायला लागला. मी त्याच्या कडे वळून त्याला विचारले कि हे त्यास कशा मुळे शक्य झाले,त्याचे उत्तर होतेSir minimum investment and fast delivery लग्नातील फोटोसाठी ज्या equipment ची गरज आहे तेच वापरा आणि लग्नानंतर १० ते १५ दिवसात album दया,ह्या मुळे तुमचे नाव होते,पैसे योग्य वेळेवर मिळतात. तेथून परत आल्यावर मी माझ्या ग्राहकांना order घेताना सांगायला लागलो कि मी सर्व फोटो marking साठी देणार नाही जसे portrait आणि rituals{विधी},मी त्यांच्या कडून फक्त group फोटो marking करून घेतले ते पण त्यांच्या घरी जाऊन, ज्या साठी फारफारतर माझा १ तास गेला असेल. पण मी खरोखर २० ते २५ दिवसात कितीतरी अल्बम देऊ शकलो.Album वेळेवर देणे हे फक्त पैशा पुरते नसून,त्या मुळे तुमचे ग्राहकाशी चांगले relation निर्माण होतात एक विश्वासाचे नाते निर्माण होण्यास मदत होते. त्यांचा अल्बम मधील interest वाढतो.एक कायम लक्षात ठेवा album हे तुमच्या advertising चे मुख्य साधन आहे आणि राहील.मग ते soft copy स्वरुपात असो नाहितर hard copy स्वरुपात. नुसते काढलेले फोटो without Photoshop किती छान दिसतात ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहेच. मी स्वतः आणि माझे ग्राहक ह्या कार्यपद्धतीवर संतुष्ट आहोत.आपण दोन photographers चे बाराशे ते पंधराशे फोटो marking साठी देतो आणि लवकर marking मिळेल अशी अपेक्षा करतो,हा गुन्हा आहे असे आपणास वाटत नाही का ,वास्तविक आपले designer त्या काळात रिकामेच असतात. Dont work hard just make it smart.
Posted on: Fri, 18 Oct 2013 18:01:33 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015