महिलांशी वर्तन न - TopicsExpress



          

महिलांशी वर्तन न सुधारल्यास विनयभंगाचे गुन्हे #lalbaugcha #raja, #mumbai, #RRpatil मुंबई - भक्तिभावाने लालबाग राजाच्या दर्शनाला येणाऱ्या महिला भक्‍ताशी गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांची गंभीर दखल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतली आहे. लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांनी अशाप्रकारचे वर्तन रोखले नाही, तर त्यांच्या विरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल करू, असा सणसणीत इशारा आर. आर. पाटील यांनी आज दिला. मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. लालबाग राजाच्या दर्शनाला आलेल्या एका महिला भक्‍ताशी एका कार्यकर्त्यांनी क्रूर वर्तन केले. या महिलेला धक्‍के मारत रांगेतून बाहेर काढणाऱ्या या कार्यकर्त्याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले. त्यामुळे, लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत आज पाटील यांना विचारले असता, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची सूचना पोलिसांनी केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराची चौकशी पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. मात्र, गणेश दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक महिला भक्‍ताची सुरक्षा करण्याची जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले असून, पोलिस या कामी मंडळाच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण सहकार्य करत आहेत. पण, कार्यकर्त्यांनी कायदा हाती घेऊन अशा प्रकारे गैरवर्तन केले. महिलांची छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले तर कोणत्याही परिस्थितीत ते खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
Posted on: Tue, 17 Sep 2013 07:12:09 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015