श्री.चौधरी यांचा - TopicsExpress



          

श्री.चौधरी यांचा प्रतिक्रियात्मक लेख व त्यावरील त्यांच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.. 11:15pm Vishwambhar Choudhari 8 hours ago लोकसत्तेतील (२९ ऑक्टोबर ) माझ्या “नामाचा गजर, गर्जे मुठा तीर” या लेखाचा सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक प्रा. हरी नरकेजी यांनी फेसबुकवर “सावित्रीला विरोध, गर्जे विश्वंभर” अशा शीर्षकाखाली प्रतिवाद केला आहे. त्यावर माझे म्हणणे मांडण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. सुरुवातीच्या परिच्छेदात माझ्याबद्दल लिहीत असतांना “चौधरी हे उजव्या छावणीचे परमपूज्य विचारवंत आहेत” असे विधान त्यांनी केले आहे. कोणत्या उजव्या संघटनेला मी कधी मार्गदर्शन केले त्याचाही उल्लेख त्यांनी केला असता तर मी नेमका कोणाला ‘परमपूज्य’ आहे हे मलाही कळले असते ! माझे आतापर्यंतचे (जे काही, जिथे कुठे तुटके-मुटके लिहिले असेल ते) लेखन, व्याख्यानांमधून यथा-मती होणारी अभिव्यक्ती, मराठी च्यानेल्स वरून व्यक्त होणारी त्रोटक मते हे सर्व लोकांसमोर आहे. यात मी “उजव्या छावणीचा मार्गदर्शक” असल्याचे कोणीही दाखवून द्यावे. महाराष्ट्रात एक अशी सोयीस्कर पद्धत रूढ झाली आहे की उजव्यांच्या विरोधात बोललो की आपल्याला लगेच “मुस्लीमधार्जिणे” ही पदवी मिळून जाते आणि पुरोगामी मंडळींचा एखाद्या मुद्द्यावर प्रतिवाद केला की आपण लगेच “संघवादी” या पदवीस पात्र होतो ! तिसरा विचार उपलब्धच नाही. हीच मांडणी महाराष्ट्राच्या समाजकारणात आजकाल होत आहे. तुम्ही एकतर प्रतिगामी तरी आहात किंवा पुरोगामी तरी ! (इथे “पुरोगामी” या शब्दाचा मूळ अर्थ अपेक्षित नसून “आम्ही म्हणतो तोच पुरोगामीपणा आणि आम्ही म्हणू तेवढेच लोक पुरोगामी” हा नव-पुरोगामीत्ववाद अपेक्षित आहे). वस्तुत: विचारवंत प्रतिगामी किंवा पुरोगामी असतात, उजवे किंवा डावे असतात, धर्म-सापेक्ष किंवा धर्म-निरपेक्ष असतात, बहुसंख्य समाज मात्र ‘व्यवहारवादी’ (चांगल्या अर्थाने) असतो आणि तो शक्यतो मध्यम-मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. नरके सरांनी मी अण्णा हजारे यांचा ‘मार्गदर्शक’ आहे असाही एक नवाच शोध लावला आहे. वस्तुत: कोणाचाच मार्गदर्शक होण्याची माझी लायकी नाही कारण मीच अजून शिकतो आहे ! समाज, समाजाचे प्रश्न, समाजाच्या अस्मिता आणि एकूण समाजमन हे अजून मलाच पुरते कळले नसेल तर मी कसा कोणाचा मार्गदर्शक होऊ शकणार? मी कोणाचाही मार्गदर्शक वगैरे नसून काही चळवळींचा कार्यकर्ता आहे. अण्णा, मेधाताई यांच्या निवडक चळवळींमध्ये थोडाफार- अगदी खारीचा- वाटा उचलतो आणि माध्यमे जेव्हा जेव्हा चर्चेसाठी बोलावतात तेव्हा सामान्य माणसाचा आवाज राजकारण्यांपर्यंत पोचवायचा क्षीण-दीन प्रयत्न करतो, या पेक्षा माझी वेगळी ओळखही नाही आणि योग्यताही नाही. भ्रष्टाचार, शिक्षण, पर्यावरण या विषयात माझाच शब्द शेवटचा मानावा असे माझे “समर्थक” सांगतात असाही नरके सरांचा दावा आहे? कोण बुवा हे समर्थक? नावे कळली असती तर फार बरे झाले असते. एवढेच नमूद करतो की “समर्थक” नेत्यांना असतात, एखाद्या किरकोळ कार्यकर्त्याला नाही ! त्यामुळे मला “समर्थक” असण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय मी कुठलाच “वादी” नसल्याने कट्टर वगैरे समर्थक मिळण्याची शक्यता नाहीच नाही. या प्रतिवादाचा एकूण गाभा असा आहे की माझा मूळ नाम-विस्तारालाच छुपा विरोध आहे आणि गुणवता, दर्जा वगैरेची चर्चा केवळ नाम-विस्ताराला आडून विरोध करायचा म्हणूनच आहे. नरके सरांच्याच शब्दात सांगायचे तर ही माझी ‘बेईमानी” किंवा “लबाडी” आहे आणि फुले, आंबेडकर यांनाच माझा विरोध आहे. आमचे जेष्ठ मित्र मानवभाऊ कांबळे यांचाही प्रतिवाद चांगल्या शब्दात पण साधारण याच आशयाचा आहे. माझा नाम-विस्ताराला विरोध असता तर लेख लिहायची गरज नव्हती, घटनात्मक अधिकार वापरून उच्च न्यायालयात सिनेटच्या ठरावाला आव्हान देता आले असते. अधिसभा म्हणजे लोकसभा नाही. लोकशाही म्हणून काय अपेक्षित आहे असे विचाराल तर केंद्र सरकार सुद्धा एखादा नवा कायदा करतांना संपूर्ण जनतेचे आक्षेप किंवा मते जाहिरात देऊन मागवून घेते. पुणे विद्यापीठाची अधिसभा केंद्र सरकारच्याही वर आहे का? अधिसभेने विद्यापीठाचे stake holders म्हणजे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, संलग्न महाविद्यालये इ.इ. यांची मते किंवा आक्षेप मागवले होते का? विद्यापीठ कायद्याच्या कोणत्या कलमान्वये अधिसभेला असा अधिकार प्राप्त होतो? केवळ अधिसभा एकमताने म्हणते म्हणजे ती लोकशाही असे होते का? उद्या अधिसभेने विद्यापीठ विकून टाकायचा ठराव अगदी एकमताने पारित केला तर त्याला लोकशाही संमत कारवाई म्हणायचे का? हे प्रश्न न्यायालयात उपस्थित करता आले असते मात्र सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मलाही तेवढाच आदर असल्याने मी हे करणे शक्य नाही. आज माझी बहीण, बायको, मुलगी शिकत असेल तर ते केवळ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारक कार्यामुळेच एवढी कृतज्ञ भावना माझ्या मनात नक्कीच आहे आणि म्हणून नाम-विस्ताराला माझा विरोध (अगदी छुपा सुद्धा) असूच शकत नाही. घटनात्मक अधिकाराचा वापर करायचाच ठरवला तर भिण्याचा, घाबरण्याचा माझा स्वत:चा इतिहास नाही, अन्यथा शरद पवार यांच्या सारख्या महासत्तेशी लवासा सारख्या प्रकरणात मी एक वादी म्हणून न्यायालयात झुंज दिली नसती. एरवी संमेलनांमधून समतेच्या मोठमोठ्या गप्पा मारणारे भले-भले समतावादी लवासाग्रस्त दलित, श्रमिक, आदिवासी, शेतकरी, धनगर यांच्या बाजूने अवाक्षरही बोलत नाहीत हे महाराष्ट्र बघतो आहेच. माझा मूळ मुद्दा एवढाच की नाम-विस्ताराला विरोध न करणे हे ढोंग, बेईमानी किंवा भीतीमुळे नसून सावित्रीबाई फुले यांच्या वरील निस्सीम आदरामुळे, कृतज्ञतेमुळेच आहे हे लक्षात घ्यावे. मराठवाडा विद्यापीठाला जेव्हा बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा होता तेव्हा मी नामांतराच्या बाजूने होतो. ती लढाई समतेची प्रतिकात्मक लढाई होती; त्या लढाईत समतेचा विजय झाला. त्यानंतर विशेषत: महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ दलित, कष्टकरी, आदिवासी यांच्या मुख्य प्रश्नांकडे वळणे अपेक्षित होते, ती फारच अल्प प्रमाणावर तिकडे वळलेली दिसते. दिसते असे की पुरोगामी चळवळ नामांतर किंवा नाम-विस्तार, पुतळे आणि स्मारके यातच गुंतून पडते आहे. राजकीय व्यवस्थेला हे चांगलेच लक्षात आलेले असल्याने ही व्यवस्था चळवळीना यातच पद्धतशीरपणे गुंतवून ठेवते आहे. चळवळींच्या संदर्भात नरहर कुरुंदकरांनी एके ठिकाणी असे म्हटले की “मठाची स्थापना करण्याची गरज असतेच मात्र योग्य वेळी मठातून बाहेर पडायची देखील गरज असते, मठातच गुंतून राहणे परवडणारे नसते”. (शब्दरचना-मला स्मरते तशी). [नरहर कुरुन्द्करांना तरी आजचे पुरोगामी ‘उजव्या छावणीचे मार्गदर्शक’ म्हणणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे.] मला असे वाटते की पुरोगामी चळवळ पुढे कशा प्रकारची वाटचाल करणार हा खरा व्यापक प्रश्न आहे मात्र आम्ही असे समजूनच चाललो आहोत की नाम-विस्तार, पुतळे आणि स्मारके हेच या प्रश्नावरचे उत्तर आहे. नरके सर हे समतावादी असून महात्मा फुले समता परिषदेच्या प्रमुख आधार स्तंभांपैकी एक आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे की आज भारतीय समाजात समतेच्या नावावर होणारे तद्दन जातीय संघटन (म्हणजे प्रत्येक जातीचे आपापले संमेलन, आपापले अभिनिवेश, जाती-पोट जातींच्या स्वतंत्र अस्मिता, इतिहास-पुरुषांची आणि संतांची सुद्धा जातीय विभागणी, अगदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या एका उमेदवाराने दुसऱ्याच्या जातीबद्दल बोलणे, नेहमीच दिसणारा ‘तुम्ही ज्या जातीचे आहात त्याच जातीच्या राष्ट्र पुरुषाबद्दल मत व्यक्त करा; अन्य जातीतील राष्ट्रपुरुषांबद्दल बोलू सुद्धा नका’ हा दुराग्रह, जाति-जातीत फक्त एकमेकांचा द्वेष इ.इ.) या सर्वाचा मेळ भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या समतेच्या आशयाशी आपण कसा घालू शकतो? “अमुक जात” म्हणण्या ऐवजी “अमुक समाज” म्हणणे इतपतच या बाबतीत भारतीय समाजाची प्रगती झालेली दिसते. जाती-अंताची तर गोष्टच दूर, भारतीय समाजात किमान विजातीय ऐक्य सुद्धा दिसत नाही ही बाब गंभीर नाही का? आणि असेल तर मग केवळ प्रतिकांच्या लढाईत समतेच्या चळवळीने गुंतून राहावे का? राष्ट्र-ध्वज, राष्ट्र-गीत ही प्रतिके जीवापाड मोलाची आहेतच पण म्हणून रोज झेंडावंदन केल्याने किंवा फक्त राष्ट्रगीतच गात बसल्याने कसे चालेल? त्यापुढे जाऊन राष्ट्र म्हणून आम्हाला निर्माण करावे लागेल हाच तर माझा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, पु. अहिल्याबाई होळकर, लो. टिळक ही महान माणसे होती आणि त्यांची करावी तेवढी स्मारके, करावे तेवढे पुतळे कमीच आहेत हे खरेच आहे, मात्र खरा प्रश्न प्रतिकांच्या उभारणी कडून त्यांच्या विचारांच्या अंमलबजावणीकडे जाण्याचा आहे. आणि म्हणूनच आपला इतिहास किती समृद्ध होता यापेक्षा वर्तमान किती अंधकारमय आहे याचे चिंतन अधिक व्हायला हवे, एवढेच मला म्हणायचे आहे. या प्रतिवादात मी माझ्या लेखात वर्तमानाबद्दल जे लिहिले त्यावर नरके सरांनी काही भाष्य केले असते तर माझ्यासह सर्वांनाच मोठे मार्गदर्शन झाले असते. आपण जर सर्वांनी मिळून ठरवले की नाम-विस्ताराची लढाई हीच समतेची लढाई तर तेही मला मान्य आहे, कारण मी लोकशाही मानतो. आता काही अपवाद वगळता राज्यातील सर्व विद्यापीठे आणि कृषी विद्यापीठे यांची नामांतरे किंवा नाम-विस्तार झाले आहेत. पुढच्या टप्प्यात जर उदाहरणार्थ भारती विद्यापीठाला मौलाना अब्दुल कलामांचे नाव, बारामती विद्या प्रतिष्ठानला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव, नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव किंवा इतर खाजगी संस्थांना राष्ट्रपुरुषांची नावे द्यावीत अशी चळवळ नरके सरांसारखे समाज-मान्य लोक उभी करणार असतील तर त्या चळवळीतील एक शिपाई म्हणून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे. हेही एकदा मनावर घ्याच ! शिक्षण क्षेत्रात प्रचंड वेगाने वाढणारी भांडवलशाही, खाजगीकरण, भारतात लवकरच येऊ घातलेली प्रचंड भांडवल-संपन्न परदेशी विद्यापीठे (यांच्या जवळील भांडवलाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही!) आणि उद्या त्या विद्यापीठांत देखील नफ्यासाठी भागीदार होण्यास उत्सुक असलेले आमचे राजकीय नेते, एकूण शिक्षणाच्या क्षेत्रात देखील देश विकायला काढण्यास मागेपुढे बघणार नाही अशी आजची राजकीय व्यवस्था, शिक्षणाच्या अतोनात खाजगीकरणामुळे गरिबाला परवडूच न शकणारे शिक्षण, सर्व शिक्षा अभियानाचा व्यवस्थेनेच उडवलेला बोजवारा, ग्रामीण शिक्षणाची मरणोन्मुख अवस्था या सगळ्या विषयांवर बोलणेच टाळायचे ठरवले तर आपण निश्चित टाळू शकतो आणि समाजाला आज केवळ नामविस्तारा सारखे विषयच प्राधान्यक्रम म्हणून घ्यायचे असतील तर ते ही मला मान्य आहे. देशाचा प्राधान्यक्रम देशातील नागरिकांनी ठरवायचा आहे, मी ठरवेल तोच प्राधान्यक्रम असे मी म्हणण्याचे कारणच नाही. नरके सरांचे म्हणणे अगदी मान्य आहे, मी काही देशाचा मालक नाही. देशाचे मालक कोण आहेत हे सर्वांना चांगलेच माहित आहे. सिंचन, रस्ते, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सर्व बाबतीत आपले मालक असलेले लोक त्यांचा मालकी हक्क भ्रष्टाचाराच्या रुपात कसा गाजवत आहेत ते ही सगळा देश पाहतोच आहे. भ्रष्टाचाराच्या लढ्यामुळे सगळे प्रश्न सुटतील असा आमचा अजिबात कधीच दावा नव्हता आणि असणार नाही. राजकीय व्यवस्थेने हवा तेवढा भ्रष्टाचार करावा आणि मग समाजाच्या अस्मिता सुखावण्यासाठी समतेचा वापर करून नामांतर-नामविस्तार यातच समाजाला गुंतवून ठेवावे आणि बुद्धीवाद्यांनी हीच खरी लढाई आहे, हीच खरी समता आहे असे लोकांना सांगावे यात विवेकवादाचा पराभव होतो असे मला वाटते. पुरोगामित्वाच्या आवरणाखाली मूळ प्रश्न झाकून ठेवून सारासार विवेकच दडपण्याचा प्रयत्न होताना दिसत असेल तर पुरोगाम्यांनाही प्रश्न विचारले जातील कारण विवेकवादाला तिलांजली देण्याचा अधिकार जसा बुरसटलेल्या प्रतिगाम्यांना नाही तसाच तो समतेच्या आडून जातीपातीचे राजकारण करणाऱ्या पुढार्यांना आणि समाजकारण करणाऱ्या पुरोगाम्यांना देखील नाही हे एकदा स्पष्टपणे मांडावे लागेल. *** 16Like · · Share Sanket Kulkarni, Hemant Rajopadhye, Vishwas Suryawanshi and 124 others like this. Prasad S Bhujbal Sir...He vaacha loka saange changle, pari kahinna vatate rajkaran, kaavil zalelyas diste jag pivle, pari dosh yaat kunacha, Bolnaryane bolat rahave, Aiknaryane sahan karave, Yaatch khare shahanpan, aani mothepana manacha.. Passhya mhane..! 7 hours ago · Like · 3 Chaitanya Barsawade अशा नामविस्तारांनी त्या-त्या समाजाचे खरे प़श्न सुटतील का ? 7 hours ago via mobile · Like · 1 Vijay Joshi खरे आहे...कितीही पुराेगामित्व आणि महापुरूषांच्या वारश्याचा आव आणला तरी महाराष्ट्रात संकुचित जातीय अस्मिता प्रच्छन्नपणे प्रखर हाेत आहेत..पण काेणी काेणाला सांगावे हाच पेच आहे..विचारवंतांनी याच्या सध्याच्या व दुरगामी परिणामाकडे लक्ष द्यायला हवे... आपल्या लेखात विराेधाचा स्वर नव्हता..काही विराेधभासाकडे व shortcut कडे लक्ष वेधले हाेते..काहीतरी प्रबाेधन झाले..हे ही नसे थाेडके.. 7 hours ago via mobile · Like · 2 Dilip Kulkarni १००% सत्य . केवळ नावाच्या आणि स्मारकाच्या मागे लागून सगळे प्रश्न सुटतील असे ह्या समाजाला त्यांचेच नेते सांगतात आणि त्यांच्या भावना भडकावून आपली पोळी भाजून घेतात. OBC ना आरक्षण मागणारे नेते त्यांच्या संस्थेत किती OBC लोकांना फुकट ADMISSION देतात आणि फुकट शिकवतात? आता समाजानेच पुढे होऊन भोंदू नेत्यांची दुकाने बंद केली पाहिजेत. खर तर समाजातील ज्या घटकांनी आरक्षणाचे फायदे घेतले आहेत त्यांनी आता न घेता तळागाळातील त्यांच्याच जातीबांधावना हे फायदे देण्यासाठी पुढे यायला पाहिजे तरच विषमता दूर होईल आणि हीच म.फुले, डॉ . आंबेडकर ह्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 7 hours ago · Like · 2 Chaitanya Barsawade आज ज्या ज्या विद्यापिठांचे नामांतर झाले, त्या त्या विद्यापिठातुन किती व कोणत्या समाजाचा यथायोग्य विकास झाला ? नामांतरा पेशा Educational दजाँ कडे ध्यान देण्याची गरज आहे !!! 7 hours ago via mobile · Like · 4 Suneel Wagh Rokthok 7 hours ago via mobile · Like Sandip Nazare zanzanit i hope ki he Narake purke punha aplya vatela yenar nahit... aaj udyacha samajachi khari garaj Olkhnarya vidvananchi aj deshala garaj vatate.. naki Samajvadacha dadya kurvalat bramhanacha navane tiri badavat Navala chitkun basnarachi.... 7 hours ago via mobile · Edited · Like · 1 Jayant Jawadekar very logical article,right analysisof progressive movement!neglecting these criticism we have to go ahead sir!we r far away fromsoverign,socialist,secular,democratic,repiblic..is it not mockery of system 7 hours ago · Like · 2 Akhilesh Kelkar Sadhya maharashtrat purogamyanchi ek navi zundashahi udayala yet chalaliye. Mage ek jan mala mhanala ki mi kattar purogami ahe. Pan tyala ek sadhi gosht kalali nahi jithe kattarata yete tithe purogamitva sampata. Sadhya mahapurushanchya navani rajkaran ani tyanche putale ubharane evadhach purogami pana uralay. Ani tyala jar koni virodh kela tar to lagech pratigami mhanje agadi sadhya saral bhashet sangaycha tar chaddivala hoto. Tumcha lekh atishay muddesud ani rokhthok hota. Apan yapudhehi ashi rokhthok mat mandat chala. 6 hours ago via mobile · Like · 1 Suhas Eklahare total agree with you 6 hours ago · Like Avinash Kajge Sir, Phule-Ambedkaranche naav gheun/waaparun khup lok mothe zaale n khup lokaanchi roji-roti aajhi chalte...Narke sir pan tyatlech aahet...tyanni kinva tyanchya saarkhya aankhi koni tumchya lekhatil matashi sahamati darshawali tar tyanchya roji-rotiche kaay honaar !! 6 hours ago via mobile · Like · 2 Krishna Varpe मोकळ्या मनानं समजून घेतला तर जबरदस्त युक्तीवाद...आणि योग्यही... विचारवंत... विचारवंत... विचारवंतांनी थोडासा विचार करावा. पुढल्या पिढीत आपण समतेची कोणती बिजं पेरतोय याचा... गुणवत्ता सुधारा म्हणावं आधी मग काय करायचं ते करा... जागतिक क्रमवारीत 300 च्या आत एकही भारतीय विद्यापीठ नाही...आपण नुसती नावंच बदलतोय... धन्य आहे. 6 hours ago via mobile · Like · 4 Tatyaa Abhyankar Jagdish Salgaonkar tu ha lekh avashya vachayla hava asa waTTa..! 6 hours ago · Like उमेश बापूराव मुंडले हरी नरके यांना राग यावा असं लेखात काहीच नव्हतं. आपण सुरवातीलाच म्हटलं होतं की नांव द्यायला आपला विरोध नाहीच. नांव ठेऊन झालं आहे आता त्याचं पावित्र्य राखण्याची चिंता नरके यांनी आणि त्यांच्या सारख्या विचारवंतानी करावी. नाहीतर हा प्रकार फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा आहे असेच म्हणावे लागेल. 6 hours ago · Like · 2 Tatyaa Abhyankar विश्वंभरराव.. नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख आणि संतुलीत लेखन.. मनापासून अभिनंदन. खुद्द नरकेसरांनाही या लेखाचं मनापासून कौतुक वाटेल अशी खात्री आहे. त्यांनी हा लेख वाचलाय का? 6 hours ago · Like · 5 Tatyaa Abhyankar Hari Narke Sir.. 6 hours ago · Like Prakash Kulkarni Vishwambhar Choudhari Sir...atishay parkhad ani tarkik pratiwaad...Narke siranchi post mi sudha wachli hoti...ani tyani kadhlela lekhacha arth mala chukicha watato, he hi spashtapane tyavar comment takun kalawale hote...pan Narke sirani kahi uttar dile nahi...kadachit te mala tumcha samarthak samajle asawet...! 6 hours ago · Like · 1 Prafulla Pathak Well said Vishwambhar Choudhari निवडक चळवळींमध्ये थोडाफार- अगदी खारीचा- वाटा उचलतो आणि माध्यमे जेव्हा जेव्हा चर्चेसाठी बोलावतात तेव्हा सामान्य माणसाचा आवाज राजकारण्यांपर्यंत पोचवायचा क्षीण-दीन प्रयत्न करतो, या पेक्षा माझी वेगळी ओळखही नाही आणि योग्यताही नाही. 5 hours ago · Like Narendra Deshmukh फारच छान ! मी original लेख वाचला नाही तरी हे आवडले ! 5 hours ago via mobile · Like · 1 माणिकराव मुळूक पाटिल Sir we better know u r not left, nor right but u r @ middle. त्यामुळे कोण काय म्हणत याचा फारशा विचार करावा अस वाटत नाही. आणि आज चळवळीमध्ये नरके सरांची काय अवस्था आहे हे देखील आम्हाला माहित आहे. 5 hours ago via mobile · Like Prashant Nighut विश्वंभर सर लेखाच्या शेवटी तुम्हीच स्पष्ट केल्याप्रमाणे सगळ्यांनी नामाचा गाजर वाचलेलं असाव बहुदा....!!! 5 hours ago · Like Nana Kulkarni त्यामुळे कोण काय म्हणत याचा फारशा विचार करावा अस वाटत नाही. आणि आज चळवळीमध्ये नरके सरांची काय अवस्था आहे हे देखील आम्हाला माहित आहे. we dont need and care for rent bases thinkar and social worker mr vishambar choudharyi sir we all with you 4 hours ago · Like · 2 Raviraj Gambhire fact based thinking 4 hours ago · Like Anupam Kambali विश्वंभरास्त्र...! या लेखाचा दर्जा दर्शवण्यासाठी केवळ एकच शब्द पुरेसा आहे. आपापल्या क्षेत्रात नावाजलेल्या दोन महान व्यक्तीँच्या विचारांची जेव्हा लढाई होते तेव्हा त्याचा परिपाक म्हणुन असा अप्रतिम लेख जन्माला येतो. फेसबुकच्या निमित्ताने हा योग आम्हा वाचकांच्या नशीबी आला याला खरच आम्ही भाग्य मानतो. एखाद्याच्या विचारांचा प्रतिवाद कसा करायचा असतो याच आदर्श उदाहरण हा लेख आहे. राहिला प्रश्न विश्वंभर चौधरीँच्या समर्थकांचा तर बाकी कोणाचे माहित नाही पण मी विश्वंभर चौधरीँचे विचार पुजनीय मानतो. त्यांचा प्रत्येक शब्द तरुणांना वेगळी दिशा देत असतो आणि म्हणुनच मी त्यांचा समर्थक आहे. शेवटपर्यँत त्यांच्या प्रत्येक कार्याला पाठिँबा देत राहिन. 4 hours ago via mobile · Like · 1 Prashanth Bhondave बुद्धीवाद्यांनी हीच खरी लढाई आहे.... its true...!! We need Mahatma Gandhis ...... NAYI TALIM... this is the only solution...!! 4 hours ago · Like Sujit Suresh Nilegaonkar अतिशय तळमळीने बाजू मांडली 4 hours ago via mobile · Like Digambar Shinde Patil Khup chan article aahe sir..... 4 hours ago via mobile · Like Ashok Gite Sir khup chhan samarpak pratyuttar.... 3 hours ago via mobile · Like · 1 John Francis Gholap Shabda Apure padtahet, Sacchya karyakartyachi hich khari (Daulat) olakh. 3 hours ago · Like Vishakha Purandare With you. Good answer 3 hours ago via mobile · Like · 2 Prabhakar Yerolkar dave ani ujve aata rahiley kuthe ? 3 hours ago · Like Sanjay Kulkarni sir mala vinoba bhave yancha nantar atishay santulit vicharsarniche koni vatale asal tar tumhi. Sir apalya sarkhya vicharvantachi deshala garaj ahe. Million of salute to you!! 2 hours ago via mobile · Like Vilas Kirote in last week only medhatai has appreciated the role and work of vishwambharji in pune. I m the eye witness of this incident, I dont think that medhatai will appreciate and will call any fundamentalist as her friend. Haribhau, vishwamharji is our friend, we could have talked with him in person, why hav u gone to media. infact u could have talked with him on phone or could have called a meeting with him. On the other hand we have read haribhaus articles in defence of hon chaganji bhujbal. Nobody from our school of thought have objected your line of thinking. I hope will try to solve our differences in person without going to media. 2 hours ago · Like · 1 Prasad Kale खळ्ळ-फट्याक झाल्यावरच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आठवण होणार्‍या नरकेंना ईतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विसर पडला की काय ?...!! about an hour ago · Like · 1 Suniti Sulbha Raghunath विश्वंभरभाऊ, तुमचा सावित्रीबाईंच्या नावाला विरोध नाही आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाजूनेच तुम्ही होता हा खुलासा तुम्ही येथे (पुन्हा एकदा आणि ठामपणे) केलात ते बरंच झालं. कारण ही दोन्ही नामांतरं त्या-त्या संस्थेसाठी योग्य अशीच होती. अन्य अनेक ठिकाणांना भलभलती (म्हणजे काही संबंध नसलेली) नावं दिली जातात त्याबद्दल सर्वच चुप असतात. सीएसटी ने काहीच अर्थबोध होत नाही आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणेपर्यंत गाडी सुटून जाते! शिवाय कोल्हापूर स्टेशनचं नाव छत्रपती शाहू टर्मिनस - म्हणजे सीएसटीच - (मी चुकत नसेन तर!). इंटरनेटवरून तिकिटं काढताना जी काय त्रेधातिरपिट उडते या गावांना शोधताना, विचारू नका! पण लक्षात कोण घेतो?! असो. हरीभाऊंची प्रतिक्रिया मी वाचलेली नाही, पण आपला हेतू शुद्ध असला तर प्रत्येक वेळी खुलासे/स्पष्टीकरणं करण्याची गरज नाही. फार शक्ती जाते! - शिवाय यावर (म्हणजे तुमच्या खुलाशावर) पुन्हा कुणीतरी काहीतरी म्हणणारच! असो-असो. या निमित्ताने तुमचा चाहतावर्ग किती मोठा आहे ते कळतंय. (मात्र त्याचीही छाननी - जातनिहाय नव्हे, वैचारिक - तुम्ही करत राहावी हा मित्रत्वाचा सल्ला! 48 minutes ago · Like · 1
Posted on: Mon, 11 Nov 2013 18:40:30 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015