श्री. शाहरुख खान (पती - - TopicsExpress



          

श्री. शाहरुख खान (पती - गौरी खान, सहनिर्मात्या चेन्नई एक्सप्रेस) स. न. वि. वि. विषय : पीव्हीआर मधील तुझ्या शोच्या तिकिटांचे पैसे परत मिळणे बाबत... मित्रांच्या आग्रहावरून काल तुझा ` चेन्नई एक्सप्रेस` हा चित्रपट पहिला. तद्दन भिकार वाटला. यात काही वेगळे दिवे लावले आहेत, असे मित्रांनी सांगितल्यामुळे आम्ही तिकिटे काढली. निराशा झाली. खरे तर तुझे पडद्यावरील माकडचाळे मला कधीच आवडले नव्हते. वास्तविक, तुझ्या चेहऱ्यावरच्या, मानेवरच्या सुरकुत्या स्पष्ट दिसताहेत. ५५ वर्षे वयाचा नायक प्रेक्षकांनी किती वर्षे सहन करायचा? अर्थात, काही जण तो सहन करतात... त्यांच्या सहनशक्तीला प्रणाम. असो, वाया घालविलेल्या पीव्हीआर मधील तुझ्या शोच्या तिकिटांचे पैसे मला परतकरून टाक. तुझा `पैसा वसूल` झाला नाही. तुझ्या सिनेमावर उतारा म्हणून मी `दुनियादारी` पहिला. तो झकास जमला. जमलेतर तो सिनेमा पाहून घे. आमची सई अंगभर कपड्यात (काही वेळ का होईना) कशी दिसते,ते सांग. माझे पैसे तेव्हढे परत दे बाबा...
Posted on: Fri, 16 Aug 2013 11:33:45 +0000

Recently Viewed Topics




© 2015