Very Touching....... हंबरून वासराले - TopicsExpress



          

Very Touching....... हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा पिठामंदी पानी टाकून पाजत जाय तवा मले पिठामंदी दिसती माझी माय कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप थरथर कापे आन लागे तिले धाप कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय तवा मले गायीमंदी दिसती माझी माय बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय तवा मले सायीमंदी दिसती माझी माय म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍... Sangrahit.......
Posted on: Mon, 21 Oct 2013 08:07:28 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015