hockey & cricket between different ( reality) - TopicsExpress



          

hockey & cricket between different ( reality) उत्तराखंडसाठी हॉकीचे दहा लाख कोट्यधीश बीसीसीआय मात्र शांतच! मुंबई- भारतातील राष्ट्रीय दुर्घटना समजल्या जात असलेल्या उत्तराखंड महापुराचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी "हॉकी इंडिया‘ने दहा लाखांची मदत जाहीर केली; पण त्याचवेळी वार्षिक 868 कोटी उत्पन्न असलेल्या भारतीय क्रिकेट मंडळाने अद्याप कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. चॅम्पियन्स करंडक रविवारी जिंकलेल्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूस भारतीय क्रिकेट मंडळाने सोमवारी लगेचच एक कोटीचे बक्षीस जाहीर केले; पण उत्तराखंड दुर्घटना होऊन पंधरा दिवस झाल्यानंतरही भारतीय क्रिकेट मंडळाने अद्याप मदतीची घोषणा केलेली नाही. भारतीय क्रिकेट मंडळाने संसद सदस्यांच्या कॉन्स्टीट्यूशन क्‍लबच्या तरणतलावासाठी देणगी दिली होती; पण उत्तराखंडबाबत मौन बाळगले आहे, अशी टीका आता सुरू झाली आहे, त्याचवेळी आता हॉकी इंडियापासून तरी भारतीय क्रिकेट मंडळ धडा घेणार का, हा प्रश्‍नही विचारण्यास सुरवात झाली आहे. हॉकी इंडिया उत्तराखंडातील पूरग्रस्तांसाठी दहा लाख पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्य निधीस देत असल्याचे "हॉकी इंडिया‘चे सचिव नरिंदर बात्रा यांनी जाहीर केले. उत्तराखंडाच्या पूरग्रस्तांसाठी मदत देणे आमचे कर्तव्य आहे, असेही बात्रा यांनी सांगितले. क्रिकेट मंडळ किंवा भारतीय संघातील खेळाडूंनी आत्तापर्यंत याबाबतची कोणतीही घोषणा केलेली नाही. शिखर धवनने आपले सर्वोत्तम फलंदाजाचे बक्षीस उत्तराखंडातील पूरग्रस्तांना अर्पित केले; तर या पुराचा फटका बसलेल्या हरभजन सिंगने दहा लाखांची मदत जाहीर केली आहे, हा अपवाद सोडल्यास भारतातील करोडपती क्रिकेटपटूंनीही काहीही मदत अद्याप जाहीर केलेली नाही. चॅम्पियन्स विजेत्यांसाठी बक्षीस देणाऱ्या भारतीय क्रिकेट मंडळाने उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी काहीच केले नसल्याबद्दल ट्‌वीटर; तसेच अन्य सोशल मीडियावरून टीकाही सुरू झाली आहे. एवढेच नव्हे; तर भारतीय क्रिकेट मंडळास कळत नसेल, तर खेळाडूंनी तरी किमान आपली बक्षीस रक्कम पूरग्रस्तांसाठी द्यायला काय हरकत होती, अशी विचारणा केली जात आहे. त्याचबरोबर भारतीय मंडळाकडे उत्तराखंडसाठी पैसा नाही; पण भारतीय क्रिकेटपटूंना देण्यासाठी पैसा आहे, असाही सूर आहे.
Posted on: Wed, 26 Jun 2013 02:00:34 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015