एक प्रेमकथा एकाच - TopicsExpress



          

एक प्रेमकथा एकाच कॉलेजमध्ये असुनदेखील खुप दिवसापासुन आमच्या नजरेचेच संवाद होत होते. मी 3RD YEAR चा विद्यार्थी आणि ती 1st year ची विद्यार्थीनी. खुप दिवसापासुन तिला विचारावं विचारावं म्हणत होतो, पण आज वेलेंटाईन डे आहे मी पुर्ण तयारी केली, आणि पुर्ण हिंमत करून विचारलं देखील, तिने लाजुन होकारार्थी मान हलविली, माझ्या आनंदाला पारावाराच उरला नाही मी खुपच आनंदीत झालो. आमचं कॉलेजमागच्या तळ्याकाठी भेटणं ठरलं। मी खुपच उत्साहीत झालो होतो आजच्या दिवसाबद्दल कारण आज ति मला त्या तळ्याकाठी भेटणार होती,मी तिथे तासभर आधीच पोहोचलो कदाचित मला राहवंत नव्हता ना म्हणुन,पण ती तर माझ्या आधीच तिथे पोहोचली होती. तिला पाहुन मी तर दचकलोच,आणि मला पाहुन ती ही,मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो आपलं तर दहा वाजता भेटायचं ठरलं होतं ना,ती म्हणाली हो पण मला तुझ्या भेटीची ओढ राहावली नाही... मी म्हणालो मलाही..... तशी ति लाजली .... काय ते तिचं लाजणं...वेड लावणारं होतं. मी तिच्यासाठी आणलेली ती गुलाबाच तिला दिली ती तर एकदम खुश झाली। आणि मी तिला पुन्हा एकदा म्हणालो i love u मग ती म्हणाली i love u2. ते ऐकुन मला धन्य झाल्यासारखं वाटत होतं। अशा प्रकारे सुरु झालेलं आमचं बोलनं जवळजवळ तासभर चालु होतं,तळ्यावर पडलेली सकाळची परावर्तित सुर्यकिरणे खुपच सुंदर दिसत होती. पक्षांचा चिवचिवाट, झाडाखालची थंडगार सावली अन तळ्यातलं ते शांत पाणी खुपच मोहक वातावरण, आणि माझी परी माझ्यासंगे आहे आणि काय हवं असंच वाटत होतं मला त्यावेळी.... बोलता बोलता मी तिच्या केसांशी खेळ होतो ते तिलाही आवडतं होतं।मग ती पाय पसरुन झाडाशी टेकुन बसली,मी माझं डोकं अलगद तिच्या मांडीवर टेकवलं आणि पुन्हा तिच्या केसाशी खेळु लागलो. ती माझ्याकडे बघत गाल्यातल्या गालात हसत होती,मी हळुच तळ्यातील पाणी तिच्या डोळ्यावर शिंपडलं, ते तिला आवडलं कदाचित,मग तिनेही माझ्या डोळ्यावर पाणी शिँपडलं, मी पुन्हा पाणी शिंपडलं ,तिने पुन्हा पाणी माझ्या चेहर्यावर शिँपडल्यावर मला काहीतरी बोलु लागली। . . अरे मेल्या उठतोस का नाही केव्हापासुन तुला पाणी मारुन उठवतेय कॉलेजला जायचं नाही का रे?.... (माझी आई माझ्या चेहर्यावर पाणी मारुन उठवत होती..) किती सुंदर स्वप्न बघत होतो,आणि आईने सगळ्यांवर पाणी फिरवलं ..... . . रंच अशा सगळ्या सुंदर घटना स्वप्नातच घडतात. " nisha
Posted on: Thu, 03 Oct 2013 11:48:30 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015