काल, शनिवारी हेल्पलाईनची - TopicsExpress



          

काल, शनिवारी हेल्पलाईनची मिटिंग तब्बल ५ तास चालली, क्रीडा, स्थापत्य विभागाचे नेहमी विचारले जाणारे प्रश्नांवर (FAQ) चर्चा झाली, त्यातच कळले कि पालिकेचे Tennis, Badminton Court रविवारी बंद असतात. यावर रविवारी बंद न करता सोमवारी किंवा कुठल्याही working day ला साप्ताहिक सुट्टी द्यावी अशी सूचना मी केली, आयुक्तांनी लागलीच सूचनेला दुजोरा दिला, तेव्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सोमवारी किंवा शुक्रवारी सुट्टी करता येईल असे उपस्थितांना सांगितले. त्यामुळे मुलांना रविवारी सुट्टीच्या दिवशी कोर्ट उपलब्ध होणार आहे अजून एक सूचना तिथे मांडली - जास्त खर्चिक नसल्याने आणि तीन महिन्यांचे Advance booking करता येत असल्याने कंपन्या, क्लब महिन्याचे सर्व शनिवार, रविवार booking करून ठेवतात त्यामुळे अनेक मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होत नाही. आठवड्यातला सुट्टीचा एक दिवस तरी मैदाने सर्व मुलांसाठी खुली असावीत, त्या दिवशी कोणाचेही booking घेऊ नये. यावर उत्तर देताना क्रीडा अधिकारी श्री. माचरे यांनी असे करणे शक्य आहे पण tournament असल्यास अडचण येऊ शकते. मदनलाल धिंग्रा सारखी पिंपरी-चिंचवड मधील मैदाने आठवड्यातला एक दिवस तरी सर्वांसाठी खुली असावीत का? याबद्दल आपले मत काय
Posted on: Sun, 14 Jul 2013 05:54:54 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015