"नमस्कार, मी हर्षद ... माझं - TopicsExpress



          

"नमस्कार, मी हर्षद ... माझं गाव महाड.. हो तेच शिवरायांच्या किल्ले रायगड पायथ्याचे महाड! मी सांगतोय तो किस्सा माझ्या आजीने खूप वेळा सांगितला आहे. तर किस्सा आहे १९७५ च्या आसपासचा.. माझ्या आजीला ४ मुले .. पैकी सगळ्यात धाकटा म्हणजे माझा अशोक मामा .. एका छोट्याश्या कुतूहलाची त्याला काय किंमत मोजायला लागली ती पहा .. आठवी-नवविच्या परीक्षा संपवून मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्या होत्या. अशोक मामा, त्याचे २ मित्र, सुधीर आणि बिपिन हे सगळे बौध्द लेणी असलेल्या डोंगरावर फिरायला म्हणुन गेले होते. लेण्याला जायचं म्हणजे महाडच्या क्रांती स्तंभ पासून, दाट झाडी सुरु होते, त्यातून जाव लागायचं. वाटेत लागणारी काळ नदी पार करावी लागायची. माझ्या लहानपणीची आठवण म्हणजे, साधारण २० वर्षापूर्वी सुद्धा नदीच्या पत्रातून चालत जावून नदी पार केलेली आहे. तर दुपारभर फिरून हे परत यायला निघाले. जरासा उशीरच झाला होता, कातरवेळ झाली असावी. नदी झटपट पार करून हे झाडीत घुसले. कही अंतर चालून गेले असतील तर एका विहिरीच्या काठावर एक वयस्कर माणूस बसलेला दिसला. सहज म्हणुन चौकशी करायला हे तिघे त्याच्याकडे गेले, जवळ जातात तर विहिरीवर कोणीच नाही. आडरानातल्या विहिरीमध्ये भलत्या वेळेला डोकावून पहायचे नसते हे आता अशोक मामाला चांगले उमगले आहे, कारण मामानी तो माणूस विहिरीत पडला का हे बघायला डोकावून पाहिले. बाकी दोघे सांगतात विहीर कोरडी होती, आता काही नव्हते. मामाला मात्र चक्कर आल्या सारखे झाले. थोडे पाणी वैगरे पाजून मामाला घरी सोडून मित्र निघुन गेले. मामा घरी आला नि झोपला, दमला असेल म्हणुन कोणी लक्ष दिले नाही. . हा रात्री ११ वाजता उठला, आणि सरळ नाचायलाच लागला.. कुणालाच काहीच कळायला तयार नाही.. नाचायचा, विचित्र आवाजात ओरडायचा.. स्वतःला ओरबाडून घ्यायचा.. कपडे फाडायचा, डोळे गरगरा फिरवायचा ..सगळचं विचित्र !! घरचे सगळे भांबावून गेले.. आजीने पटकन माहित असलेले उपाय केले. लिंबू कापून उतरवले, दहीभात उतरवला, अंगारा लावला .. पण काहीच फरक नाही. असे साधारण १५ रात्री चाललेले. आळीतले लोक पण चिंताक्रांत, कोण कोण काही ना काही उपाय करतंय .. अंगारे धुपारे कोंबड बकर म्हसोबा सगळं झाला पण हां असाच ..!! हे सगळे होत असताना, संजीव म्हणजे २ नंबरचा मामा हा दापोलीला आजोळी गेलेला परत आला. कार्ल्याची एकविरा देवी ह्याच्या अंगात यायची. कार्ला गड १० -१५ मिनिटात चढून देवळात गेलेला किती तरी लोक सांगतात. तर हा घरी आला आणि त्यानी रात्री चाललेला प्रकार पाहिला. तस पान सुपारी ठेवून देवीला साकडं घातलं की माझ्या भावाला वाचव. तशी देवी ह्याच्या अंगात आली आणि उपाय सांगितला. पौर्णिमेच्या रात्री (२ दिवसांनी पोर्णिमा होती) ह्याला उघडा करून अंगणात बसवून आंघोळ घाला, कपाळाला बुक्का लावा आणि दहीभात, कणकेचे दिवे अस ताट करून ओवाळा आणि मागे न बघता वडाच्या झाडाखाली ताट ठेवून द्या. संजीव मामाने असे बोलून अशोक मामाच्या कपाळावर गंध लावल्यासारखे केले आणि दोघेही धाडकन खाली पडले. ते उठले दुसऱ्या दिवशी दुपारी. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळ पासून अशोक मामा बेफाम झालेला, त्याचा आवाज विचित्र भांडी खरवडल्यासारखा येत होता. "हे माझ झाड, आज मी ह्याला नेणार", असं काहीसा बडबडत होता. आळीतल्या १० पोरांनी त्याला पकडला आणि बांधून घातला. होता होता मध्यरात्र झाली, मग संजीव मामानी देवींनी सांगितलेला उपाय केला. वडाच्या झाडाखाली त्यानी ताट ठेवलं आणि क्षणात मागे वळून पळतच अंगणात आला. त्याच्या मग काही क्षण खसखसलेला आवाज, वखवख ऐकू येत् होती. उतरवून काढल्यावर अशोक मामा थोडा शांत होतं गेला मग झोपला. सकाळी उठला तेव्हा त्याचा डावा डोळा तिरळा झालेला आणि उजव्या डोळ्यांनी अंधुक दिसायला लागलं ते कायमचं !! ते काय होतं काय नव्हत् त्याच्या भानगडीत कोणी पडल नाही, कारण पत्रावळीच्या चिंध्या करत दहीभात उधळत नाचणारा म्हातारा आख्या आळीने दिव्याच्या अंधुक प्रकाशात पाहिला !!! आता नदीवर पूल झालाय, वस्ती वाढलीय .. ति विहीर लोकांनी बुजवून टाकली णी तिथे छोटंसं मंदिर उभारलं. पण मामा काही परत लेणीच्या वाटेला गेला नाही!!..." समाप्त
Posted on: Wed, 24 Jul 2013 21:19:27 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015