माझ्या प्रिय मित्र आणि - TopicsExpress



          

माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आपला एक मित्र आपल्याला एक घटना सांगणार आहे . ती घडून फक्त १५ दिवसच झाले आहेत. आता मी तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करतो... त्या दिवशी घडले असे की, माझ्या घराच्या समोर एक ५ मजली इमारत आहे. त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काही मुले आणि मुली राहतात. त्यातील काहीजण कॉलेज करतात तर काहीजण जॉब करतात. त्यामधील एक मुलगी कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. त्या दिवशी तिची रात्रपाळी होती. त्या दिवशीचे काम आटोपून ती आपल्या रुमवर आली. त्यावेळी रात्रीचे साधारणतः २ वाजले होते. घरी आल्यावर हात-पाय धुऊन ती दुसर्या मुलीबरोबर थोडावेळ गप्पागोष्टी करु लागली. गप्पागोष्टी झाल्यानंतर तिला भुक लागली. ती आणि तिची मैत्रिण स्वयंपाकघरात गेल्या. तिने बघितले तर फ्रिजमध्ये ४ अंडी होती. तिने ती घेतली आणि अंड्याची पोळी बनवू लागली. तिने स्वयंपाकघरातील वाफ बाहेर जावी म्हणून तिथली खिडली उघडली. त्या खिडकीच्या पलिकडे बाहेर एक आंब्याचे मोठे झाड होते. तिने एक अंड्याची पोळी बनवली आणि ती प्लेटमध्ये घेणार इतक्यात ती अंड्याची पोळी खिडकीमधून खाली पडली. तिला काहीच कळले नाही. तिला वाटले की चुकून खाली पडली असेल म्हणून तिने दुसरे अंडे घेतले. पुन्हा तिच्याबरोबर तसेच घडले. आता मात्र ती थोडीशी घाबरली. भुकेपोटी तिने तिसरे अंडे उचलले आणि तव्यावरती टाकले. नंतर आपल्यासोबत काय घडले हे सांगण्यासाठी ती बाहेर रुममध्ये आली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या बाकीच्या साथीदारांना सांगितला आणि सर्वजण स्वयंपाकघरात धावत गेले. त्यांनी तिथे जाऊन पाहिले तर ते तिसरे अंडेसुद्धा तव्यावर नव्हते. पुनमने सर्वांना सांगितले की अगोदरसुद्धा असेच घडले. तिने घाबरत घाबरतच त्यांना सांगितले की ते तिन्हीं अंडी खिडकीच्या बाहेर पडली आहेत. ते ऐकताच सर्वजण खिडकीजवळ गेले आणि खरोखरच ती बाहेर पडली आहेत का ते खिडकीतून बाहेर खाली वाकून पाहू लागले. त्यानंतर त्यांना जे काही दिसले ते फार भयानक होते. ते दृष्य पाहून ते सर्वजण फार घाबरुन गेले. त्यांनी पाहिले की त्या आंब्याच्या झाडावर एक बाई बसली होती. तिच्या हातात अंड्याची पोळी होती आणि ते ति बाई खात होती. त्या बाईने ते अंडे खात-खात त्यांच्याकडे पाहिले तसे ते सर्वजण घाबरुन जोरजोरात ओरडू लागले आणि ओरडतच त्या स्वयंपाकघरातून थेट इमारतीच्या खाली पळत-पळत आले. त्यांच्या त्या आवाजामुळे आजुबाजुचे सर्वजण जागे झाले आणि मी पण जागा झालो. ते सगळे इमारतीच्या खाली रस्त्यावर येऊन उभे होते. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विचारले की, काय झाले? तुम्हीं का ओरडत आहात आणि एवढे का घाबरला आहात? तेव्हा पुनमने घडलेला सर्व प्रकार मला सांगितला. त्या दिवशी ते सर्वजण शेजारच्या काकूंकडे झोपले आणि सकाळ झाल्याझाल्या आपापले सर्व सामान घेऊन ते कायमची ती रुम सोडून तिथून निघून गेले. हि घटना खरी आहे त्यामुळे कृपया ह्यावर कोणीही वाईट कमेंटस करु नये........................
Posted on: Tue, 19 Nov 2013 18:05:58 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015