शाळा आमची छान होती … Last bench - TopicsExpress



          

शाळा आमची छान होती … Last bench वर आमची team होती …. Cricket च्या वेळी Ground वर Cheating व्हायची . जन-गण-मन ला कधी कधी ..शाळेबाहेर सुद्धा उभे रहायचो … प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही …. प्रतिज्ञा म्हणायचो … प्रार्थनेच्या वेळी मात्र…. सगळ्यांसारखे…नुसतेच ओठ हालवायचो…. पावसाळ्यात शाळेत जाताना,छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं…पुस्तक भिजू नये म्हणून …. त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. शाळेतून येता येता … खाद्या डबक्यात उडी मारून… उगीचच सगळ्यांच्याअंगावर पाणी उडवायचं प्रत्येक Off -Period ला P.T. साठी…. आमचा आरडाओरडा असायचा … शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा…. तो बर्फाचा गोळा संपवायचा …. आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात …. शिव्या सूद्धा नाही द्यायचो … इतिहासात वाटतं ….होता शाहिस्तेखान … नागरिक शास्त्रात पंतप्रधान …. गणित… भुमितीत होतं … पायथागोरसचप्रम ेय… भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सून … का कुठलेतरी… वायव्य…. हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा” English मधल्या Grammar नेच झालीहोती आमची व्यथा … शाळा म्हटली कि अजूनही आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights” खेळणं …. Exams मधल्या…रिकाम्या जागा भरणं… आणि जोड्या जुळवणं … **अशा ह्या अविस्मरणीय आठवणी शाळेतील**
Posted on: Sat, 20 Jul 2013 05:47:35 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015