सध्या फेसबुक वर अपलोड - TopicsExpress



          

सध्या फेसबुक वर अपलोड होणारी विकृत फोटो, फेसबुक अकाऊट hack करणे यासारखे प्रकार वारंवार घडत आहेत,म्हणून मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेल तर्फे काही आवश्यक अश्या गोष्टी त्यांनी जनजागृतीच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत आणून दिली आहेत. ती माहिती आपल्यासाठीसुदधा फायदेशीर आहे. कृपया वाचा आणि शेअर करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी मदत करा. सायबर पोलिस काय म्हणतात डोळे उघडे ठेवा मुलींची खबरदारी घ्यायची कशी? १) सध्या फेसबुकवर सगळी खासगी माहिती देण्याची चढाओढच सुरू आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसभरात काय काय केलं ही सर्व माहिती विथ फोटो फेसबुकवर काही जणी टाकतात. ते टाळा. आपली सिक्युरिटी सेटिंग अधिक मजबूत करा. पिकनिक असो की हनिमून, घरी परतण्याआधी फेसबुकवर माहितीसह फोटो यातूनच विकृतांना खाद्य मिळतं, त्यामुळे खासगी तपशील चव्हाट्यावर देणं थांबवा. २) फेसबुकमध्ये कुणाच्याही प्रोफाईलमधल्या फोटो ऑप्शनवर क्लिक केलं तर ते फोटो स्वत:च्या कॉम्प्युटरवर सेव्ह करण्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. एखाद्या तरूणीचा साधा फोटो आणि त्याखाली तिचा मोबाइल नंबर जाहीर केल्याची अनेक प्रकरणे सायबर पोलिसांनी तपासली आहेत. त्यामुळे रोजच्या रोज आपले प्रोफाईल फोटो बदलणं, जास्तीत जास्त फोटो अपलोड करणं महागात पडू शकतं. अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्याआधी विचार करा. ३) आपल्याला किंवा दुसर्‍या एखाद्या मुलीला कुणी शूट करतोय असा जरा जरी संशय आला तर लागलीच त्याला हटका, मोबाईल दाखव म्हणून आरडाओरडा करा. ४) जिथे कुठे चेंजिंग रूमचा वापर करावा लागेल तिथे सतर्क रहा, चेंज करण्यासाठी घाई न करता थोडा वेळ ती रूम नीट पाहा. कुठे काही संशयास्पद दिसले तर विचारा. ५) आरसे पहा, आरशाला अंगठा टेकवून पहा. तसं करताना आरसा आणि अंगठा यात काही गॅप आहे, असं वाटलं तर जरा सावध व्हा. ६) सार्वजनिक शौचालय, बस-रेल्वेस्टेशन इथली शौचालयं वापरताना काळजी घ्या. ७) आपले खासगी क्षण मोबाइल कॅमेर्‍यात कुणी शूट करत असेल तर त्याला विरोध करा. ८) कुणी कितीही इमोशनल ब्लॅकेमल केलं तरी खासगी क्षणांचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिप काढू देऊ नका. ९) काढले असतील आणि त्यावरुन कुणी ब्लॅकमेल करत असेल तर त्या ब्लॅकमेलिंगला बळी पडून करणार्‍याच्या मनासारखं वागू नका. थेट पोलिसांकडे तक्रार करा. १0) पोलीस तुमचं नाव गुप्त ठेवतील याची खात्री बाळगा. ११) बदनामी टाळण्यासाठी अनेक मुली वारंवार ब्लॅकमेलिंगला बळी पडून स्वत:चं शोषण ओढवून घेतात, ते टाळा. हिमतीनं पोलिसांत तक्रार करा. तक्रार कशी करायची इंटरनेट किंवा मोबाइलच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक, बदनामी, ईल मजकूर-फोटो-क्लीप, धमक्या यापैकी कोणत्याही तक्रारीसाठी थेट सायबर सेल किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करता येऊ शकते. मात्र प्रसंगी जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार करता येऊ शकते. तांत्रिक मदतीसाठी सायबर पोलिसांकडे ही तक्रार येते. बाकीचा तपास स्थानिक पोलीसच करतात. सायबर सेलशी संपर्क पुणे : +91-20-26127277 +91-20-26165396 मुंबई : [email protected] +91-022-24691233 नागपुर : 712-2566766
Posted on: Fri, 27 Sep 2013 07:31:20 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015