१७ तारखेला - TopicsExpress



          

१७ तारखेला बाळासाहेबांना जाऊन एक वर्ष पूर्ण होईल. माझ्या आयुष्यातील सर्वात महा प्रचंड अंतयात्रा मी पहिली ती म्हणजे बाळासाहेबांची. मनावर परिणाम करेल आस अप्रतिम वक्तृत्व. लोकांचे लक्ष वेधून घेईल असे व्यक्तिमत्व. काठावरची मते फिरवून टाकेल असा भाषणाचा बाज, समोरच्याला भारावून टाकेल असा पेहराव. मला त्यांची मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळची एक मुलाखत आठवतेय. त्यावेळी प्रश्नकर्त्याने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते. My stand is very clear and transparent. I am totally firm and confirm about my statements. Whatever I said, I said. That all. I did not avoid any statement regarding to particular this subject, stated by me, in any manner. Now the ball is in his court and he have to decide what to do. What can I do ? एव्हढे स्पष्ट बोलणारा एकही वक्ता आता नाही. आता सगळे शब्द फिरवणारे. बाळासाहेब जसे इंग्लिश बोलत असत तशी इंग्लिश वर हुकुमत तर आता एकही मराठी नेत्याची नाही. इंग्लिश भाषेवर, राज्यावर, वक्तृत्वावर, संघटनेवर, स्वतःच्या सार्वजनिक लुकवर, राज्याच्या राजकारणावर, देशाच्या राजकारणावर, त्यांची हुकुमत होती. विरोधकांना सरळ सरळ शिंगावर घेणारा एकमेव नेता. ज्यांनी शिवाजी पार्क पहिले असेल त्यांनाच कळेल कि सभेला शिवाजी पार्क भरवणे म्हणजे काय असते ते.? खायचे काम नाही ते. ज्यांनी त्यांची भाषणे ऐकली आहेत त्यांनाच कळेल वक्तृत्व म्हणजे काय ते. भाषणात स्थानिक राजकारणाचे आणि विरोधकांचे अत्यंत बोचऱ्या शब्दात ते समाचार घ्यायचे. एकहाती संघटना चालवणारा असा नेता नाही. ४० वर्षे एकाच दिवशी एकाच ठिकाणाहून उभे राहून भाषण करणारा एकमेव नेता. माझी त्यांना आदरांजली.
Posted on: Sun, 17 Nov 2013 16:05:51 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015