‘BSNL’ने आणला ‘लँडलाइन’ला - TopicsExpress



          

‘BSNL’ने आणला ‘लँडलाइन’ला पर्याय Oct 29, 2013, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे लँडलाइनची ग्राहकसंख्या कमी होऊ लागल्यामुळे भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) नवीन पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जीएसएम तंत्रज्ञानावर आधारित फिक्स्ड वायरलेस फोन (एफडब्ल्यूपीएस) रिलाँच करण्यात आले असून , अवघ्या एक हजार रुपयांमध्ये दर महिन्याला १२५ रुपयांचा टॉकटाइम मिळू शकणार आहे. लँडलाइनची संख्या कमी होत असताना लँडलाइनप्रमाणेच सर्व सुविधा असलेले एफडब्ल्यूपीएस हे उपकरण आहे. मात्र , त्यासाठी सिमकार्ड वापरावे लागते. सिमकार्ड असलेला हा फोन खरेदी केल्यानंतर एक वर्षाची व्हॅलिडिटी राहणार आहे. प्रीपेड किंवा पोस्टपेड यापैकी कोणत्याही प्रकारचे सिमकार्ड या उपकरणामध्ये वापरता येईल. सिमकार्ड अॅक्टिव्हेशनसाठी २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे उपकरण कोठेही स्थलांतरित करणे सहज शक्य असल्याचे बीएसएनएल चे अॅडिशनल जनरल मॅनेजर आशिष पाठक यांनी सांगितले. एफडब्ल्यूपीएस चा आवाज स्पष्ट असल्याने आणि नंबर डायल करण्यासाठी सोपे असल्याने प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना हे उपकरण उपयुक्त असल्याचेही पाठक म्हणाले. बीएसएनएल च्या लँडलाइनची ग्राहकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली आहे. त्यावर पर्याय म्हणून बीएसएनएल ने ही सेवा सुरू केली आहे. बीएसएनएल ची ब्राँडबँडची सेवा चांगली असल्यामुळे लँडलाइन सेवा तग धरून आहे. मात्र , तरीही पुणे विभागात गेल्या वर्षभरात सुमारे आठ हजार लँडलाइन बंद करण्यात आले आहेत.
Posted on: Tue, 29 Oct 2013 04:02:38 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015