G R A V I T Y (Must Watch American 3D Science friction Thriller n - TopicsExpress



          

G R A V I T Y (Must Watch American 3D Science friction Thriller n Space Drama !) ओढ पृथ्वीची (मातीची )… आपल्याला लहानपणापासूनच अंतराळ, अंतराळवीर नि त्यांच्या अंतराळातील मोहिमा याविषयी कमालीचे आकर्षण नि कुतूहल आहे…! हि अंतराळातील दुनिया नक्की आहे तरी कशी? याविषयी जाणून घेण्यास आपण नेहमीच उत्सुक असतो … दिग्दर्शक Alfonso Cuaron चा G R A V I T Y आपल्याला अंतराळातील त्या अद्भुत जगाची (एकांताची) सफर घडवून आणतो …! नि सरतेशेवटी मांसाळलेली आपली पृथ्वीच बरी ह्याची आपल्याला खोल जाणीव करून देतो …! तर Dr. Ryan Stone (Sandra Bullock) हि Mission Specialist (Scientist cum engineer) आपल्या पहिल्या वहिल्या अंतराळ मोहिमेवर अनुभवी अंतराळवीर Matt Kowalski (George Clooney ) सोबत (कि ज्याची हि शेवटची अंतराळवारी आहे) आलेली आहे. त्यांच्यासोबत आणखी एक अंतराळवीर आहे. तर त्यांच्यावर कामगिरी सोपवलेली आहे ती Hubble Space Telescope दुरुस्तीची… पण काही क्षणातच त्यांना mission Control, Houston येथून warn करण्यात येतं कि निकामी झालेल्या रशियन मिसाईलच्या वेगाने वाहत येणाऱ्या तुकड्यांचा तुम्हांला सामना करावा लागेल नि पुढच्याच क्षणाला भरधाव वेगाने येणाऱ्या त्या निकामी झालेल्या रशियन मिसाईलच्या असंख्य तुकड्यांचा ह्यांच्यावर वर्षाव होतो …mission Control, Houston शी त्यांचा संपर्क तुटतो नि ते तिघेही एकमेकांपासून दूर फेकले जातात . पण Matt Kowalski अखेर Dr. Ryan Stone ला शोधून काढतो नि ते दोघे पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी येतात …तेथे त्यांना त्यांचा सहकारी मृत अवस्थेत सापडतो सोबतच Shuttle ची ही प्रचंड हानी झाली असल्याने नि आता तेथे पुढील काम करणे शक्य नसल्याने ते तेथून १०० Km दूर असलेल्या International Space Station वर जाण्याचा निर्णय घेतात … पण अनुभवी Matt calculation करत आपली सहकारी Dr. Ryan Stone ला सांगतो कि पुन्हा एकदा आपल्याला त्या निकामी झालेल्या रशियन मिसाईलच्या तुकड्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे … ISS च्या दिशेने ते दोघे प्रवास करत असताना Matt ला कळते कि Dr. Ryan Stone आपली लहान मुलगी गमावल्याच्या दु:खाने खचलेली आहे … तो तिला आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहण्याचा फुकटचा सल्ला देतो ! जेंव्हा ते ISS पाशी येतात तेंव्हा त्याची सुद्धा प्रचंड हानी झालेली असल्याचे त्यांना दिसून येते नि तेथील Crew सुद्धा तेथून निघून गेलेला आहे … आता तेथील सोयुझ modules (spacecraft ) द्वारे थेट पृथ्वीवर जाणे शक्य नसल्याने Matt तिला सांगतो कि या सोयुझ modules ने जवळ असलेल्या Chinese Space Station वर जाता येईल नि मग तेथून दुसरे सोयुझ modules घेवून पृथ्वीवर परतता येईल … पण पुढच्याच क्षणाला ISS वर उतरताना पुन्हा गडबड होते नि Matt ला कळून चुकते कि आता त्या दोघांपैकी फक्त एकच जण वाचू शकतो … Ryan साठी तो हा त्याग करतो नि पुढील काही काळ तिच्याशी रेडिओद्वारे संभाषण करत पुढील प्रवासासाठी सूचना करत तिला धीर देतो… नि तेथून पुढे एकटया Dr. Ryan Stone चा अंतराळ ते पृथ्वी हा अंगावर शहरा आणणारा 3D प्रवास आपण Theatre मधेच पाहणे उचित होईल … ! दिग्दर्शक Alfonso Cuaron नि Jonas Cuaron (son of Alfonso!) यांनी लिहिलेल्या GRAVITY ची बलस्थानं म्हणजे Emmanuel Lubezki यांची Cinematography, Special Visual Effects नि प्रमुख भूमिकेत असलेली Sandra Bullock ही होत !! Special Visual Effects शिवाय आपण GRAVITY ची कल्पनाच करू शकत नाही … किंवा अशा प्रकारचे सिनेमे बनवताना Special Visual Effects हि त्यांची प्राथमिक अट असते ! नि सोबतच GRAVITY 3D मधे असल्याने सोने पे सुहागाच ! निकामी झालेल्या रशियन मिसाईलचे वेगाने येणारे तुकडे अक्षरश : आपल्या डोळ्यावर आदळतात … असा भास होवून सुरुवातीला आपण बऱ्यापैकी दचकतो ! त्यांनी अंगावर अंतराळवीरांचे सूट चढवलेले असल्याने त्यामुळे त्यांची हालचाल होत असताना त्यांचा भला मोठा पाय, हात, Hubble Space Telescope दुरुस्त करत असताना Ryan च्या हातातून सटकलेला बोल्ट आपल्याच दिशेने येतोय असा भास होतो!! सोबतच Ryan यानात असताना तिचे हेल्मेट, तिच्या सुटाचे भले मोठे हात , फायली, Spanner, Wirecutter तेथे गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्याने आतल्याआत अधांतरी फिरताना पाहून मजा येते ! GRAVITY पाहताना हि सर्व 3D ची करामत वा जादू रंगतच आणते ! Cinematographer Emmanuel ने अंतराळातून घडवलेले पृथ्वीदर्शन तर डोळ्यांचे पारणे फेडणारे असेच आहे! सोबतच अंतराळात असलेल्या यानातील बाह्य नि आतील स्वरूप पाहून आपल्या तोंडातून आपोआप Wow निघतो ! अर्थात हि सर्व किमया Emmanuel नि Team ने एका भल्या मोठ्या Studio मध्ये बसून केली आहे हे वेगळं सांगायला नको ! Steven Price यांचे संगीत GRAVITY मधे मोलाची कामगिरी बजावते … आता थोडं यातील मुख्य व्यक्तिरेखांविषयी… Dr. Ryan Stone हि व्यक्तिरेखा Sandra Bullock लाच डोळ्यासमोर ठेवून जणू लिहिली आहे असं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणवतं…! कारण त्या व्यक्तिरेखेचे वय , शारीरिक सदृढता, सदर कामात असलेलं नैपुण्य सहजपणे आपल्या Bodylanguage मधून दाखवून देणं , तसेच अशा प्रकारच्या मोहिमांवर असलेल्या व्यक्तीच्या मनाच्या कणखरपणाचा प्रत्यय Okay , its Good असं वारंवार म्हणत Sandra ने सहजरीत्या दिला आहे… सोबतच पृथ्वीवर परतण्यास अडथळे येत असल्याने I HATE SPACE म्हणत शेवटी सर्वसामान्य माणसांप्रमाणे येणारी मानसिक हतबलता , भावनिक प्रसंग तिने अप्रतिमपणे साकारलेत … खास करून शेवटचा प्रसंग जेंव्हा ती पृथ्वीवर येते नि सरपटत पाण्यातून किनाऱ्याला जात उभं राहण्याचा प्रयत्न करत असते नि पुन्हा पुन्हा खाली कोसळत असते … तेंव्हा डोळ्यांतून आनंदाश्रू गाळत हाताच्या मुठीत किनाऱ्यावरील माती घट्ट पकडून ठेवण्याचा सीन तर लाजबाबच ! तो निशब्द सीन या सिनेमाचे सार सांगून जातो… Matt Kowalski च्या भूमिकेत असलेल्या George Clooney ने सदर व्यक्तिरेखेची त्याच्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे हे ओळखून अतिशय matured नि सहज सुंदर असा अभिनय केला आहे… एक अनुभवी अंतराळवीर असल्याने अचानक आलेल्या संकटाने न हादरणारा…Senior या नात्याने नवशिक्या Ryan ला आदेश देणारा … कठीण परिस्थितीत सुद्धा रेडिओवर गाणी ऐकत ती सहजपणे हाताळणारा … नि सरतेशेवटी आपल्या junior सहकाऱ्यासाठी आपल्या जीवाचे मोल देण्याचा अवघड निर्णय क्षणात घेणारा नि शेवटच्या क्षणापर्यंत त्याला सल्ला नि धीर देणारा Matt Kowalski George ने भन्नाट साकारलाय ! असो … पूर्णपणे अंतराळ नि अंतराळवीर (फक्त शेवटचा सीन पृथ्वीवरील आहे) यांचं अद्भुत जग चित्रित केलेला हा एकमेव सिनेमा असावा ! सिनेमा खूप ग्रेट वैगेरे आहे असे मी म्हणणार नाही … पण आपलं हटकेपण जपणारा मात्र नक्कीच आहे ! सोबतच जीवसृष्टीचे अस्तित्व नसल्याने अंतराळातील भयाण वाटणारा एकांत नि तेथून माणसाला वाटणारी पृथ्वीची ओढ ह्या वास्तवाला वा सत्याला तो अधोरेखित करतो किंवा ह्या सत्याचा साक्षात्कार घडवणे हाच GRAVITY मुख्य हेतू आहे ! So… एकदा ह्या सत्याला सामोरे जाच... पण खास 3D गॉगल घालून बरं का :) ~ Kalyan (Oct 27, 2013)
Posted on: Sun, 27 Oct 2013 18:11:41 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015