आज मला अस वाटलं की - TopicsExpress



          

आज मला अस वाटलं की तुझ्याशी बोलाव शेवटच... न जाणो उद्या मी असेन नसेन ह्या जगात परत कधी मोकळेपणाने हसायला मिळेल न मिळेल म्हणून खुप खुप हसावं शेवटच...अंतरातल्या दुखला वाट करून द्यावी अश्रू न आणता केवळ सुक्या पापण्यांनी खुप खुप रडावं शेवटच... कधीच कुणासमोर मांडले नाही आतल्या आत कुढत राहिलो पण चेहऱ्यावर दाखवले नाही त्या दुखात स्वतःला दुखवाव शेवटच...हृदयाला कित्येक भाग आहेत कितीतरी जणांचे तिथे निवास आहेत नेहमीच धडकले सर्वांसाठीपण आज त्याला पूर्ण पणे थांबवावं शेवटच... नेहमी पापण्यांच्या कडा पाणावल्या पण गुपचूप ओंजळीत भरून घेतले कुणालाच न दाखविता लपविलेत्या अश्रूंना जोरात वाहू द्याव शेवटच... मनाला खुप वाटते बोलावे गावे बडबडावे कधीच नाही सांगितले मन मोकळे नाही केले पण आज वाटते ह्या सर्वांतूनच मोकळ व्हाव शेवटच... नाती खुप जपली नात्यांसाठी खुप जगलो क्षण भंगुर नात्यांसाठी रड रड रडलो त्या नात्यांना आज संपवावं शेवटच... जीवनात येऊन दुःखच वाट्याला आली दुःखाच भोगली आणि दु:खातच जगलो ह्या जीवनालाच आज संपवावं शेवटच...संपवावं शेवटच...thnk uuu...
Posted on: Thu, 20 Jun 2013 14:00:59 +0000

Trending Topics




© 2015