इको फ्रेंडली दसरा इको - TopicsExpress



          

इको फ्रेंडली दसरा इको फ्रेंडली जसा गणपती आणला तसा इको फ्रेंडली दसरा नक्की साजरा करता येतो. तसा आदर्श घालून दिलाय इचलकरंजीतील आंतरभारती विद्यालयानं. या शाळेतील मुलं टाकाऊ कागद गोळा करतात. त्याला सुंदरसा आपट्याच्या पानांचा आकार देऊन रंगवतात. त्यावर संदेश देणारी घोषवाक्‍यं तयार करून लिहितात. असं सोनं ती मुलं वाटतात. आहे का नाही अभिमानास्पद गोष्ट! घ्यायला हवा ना हा आदर्श? अन्‌ मग इको फ्रेंडली दसरा साजरा करताना अधिक आनंद होईल... तर इको फ्रेंडली सोनं घ्या, सोन्यासारखं झळाळतं व्हा!
Posted on: Sat, 12 Oct 2013 01:25:09 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015