󾭳 काल भेटला बाप्पा, जरा - TopicsExpress



          

󾭳 काल भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला... 󾭳 २ क्षण दम खातो, म्हणून माझ्या घरी टेकला... 󾭳 उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला... मी म्हटले सोडून दे, आराम करू दे त्याला... तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस??? मर्सडीज च्या जमान्यात सुद्धा उंदरावरुन फिर्तोस??? मर्सडीज नाही निदान nano तरी घेउन टाक... तमाम देव मंडळी मधे थोडा भाव तरी खाऊन टाक... 󾭳 इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो... 󾭳 भक्तांना खुश करेपर्यंत खुप खुप दमतो... 󾭳 काय करू आता manage होत नाही... 󾭳 पूर्वीसारखी मनसं आता थोडक्यात खुश होत नाही... 󾭳 immigration च्या request ने system झालिये hang... 󾭳 तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग... 󾭳 चार-आठ आने देऊन काय काय मागतात... 󾭳 माझ्याकडच्या file नुसत्या वाढतच राहतात... माझ ऐक तू कर थोडं थोडं delegation... management च्या theory मधे मिळेल तुला solution... M. B. A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे??? delegation of authority कधी ऐकलच नाहीस का रे??? असे कर बाप्पा १ call center टाक... तुझ्या सगळ्या दुताना एक एक region देऊन टाक... बसल्या जागी कामे होतील, तुझी धावपळ नको... परत जाऊन कोणाला दमलो म्हणायला नको... माझ्या सार्या युक्त्यानी बाप्पा खुश झाले... 󾭳 एक वर देतो बक्षिस म्हणून, माग हव ते म्हणाला... 󾭳 सीईओ ची position की town house ची ownership... 󾭳 immigration पण होइल झटपट, मग duel citizenship... मी हसलो उगाच, "म्हटलं खरच देशील का सांग??? 󾭳 अरे मागुन तर बघ वेड्या, थोड़ी देणार आहे टांग... पारिजातकाच्या सडयामधे हरवलेले आंगन हवं... सोडून जाता येणार नाही, असे एक तरी बंधन हवं... हवा आहे परत मानसातला हरवलेला भाव... प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव... देशील आणून मला माझी हरवलेली नाती... नेशील मला परत तिथे जिथे आहे माझी माती... इंग्रजाळलेल्या या पोरांना संस्कृतिचं लेण... आई बापाचं कधीही ना फिटनारं देण... कर्कश्श वाटला तरी ढोल ताशांचा गजर... भांडनारा असला तरी चालेल पण हवा असलेला शेजार... यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोड़ आयुष्याच भान... देशील का रे देवा यातले एक तरी दान??? "तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा सोंड़ेमागुन हसला... 󾭳सारे हाताबाहेर गेलय पोरा, खुश रहा म्हणाला....
Posted on: Thu, 12 Sep 2013 04:34:20 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015