जळगाव-पोलिसाकडून - TopicsExpress



          

जळगाव-पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार - - सकाळ वृत्तसेवा मंगळवार, 17 सप्टेंबर 2013 - 05:11 PM IST Tags: jalgaon, police, rape, crime, north maharashtra जळगाव- पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याकडून सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गणेश विश्राम पाटील या कर्मचाऱ्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसाला तत्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक एन. अंबिका यांनी दिली. गणेश विश्राम पाटील मुख्यालयात कार्यरत हा पोलिस कर्मचारी तरण तलावावर प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. गेल्या दोन वर्षापासून पीडित मुलगी व पोलिस कर्मचारी गणेश पाटील यांच्यात ओळख झाली होती. ओळखीतून मैत्री होऊन नंतर ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Posted on: Tue, 17 Sep 2013 21:41:34 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015