नागपंचमीचा संबंध “नाग” - TopicsExpress



          

नागपंचमीचा संबंध “नाग” या सर्पाशी नसून, नाग हे “टोटेम” असणाऱ्या पाच पराक्रमी नाग-राजांशी आहे. त्यांची स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती. यामध्ये अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते. त्यानंतर दुसरा वासुकी नागराजा हा कैलास मानसरोवर क्षेत्राचा प्रमुख. तिसरा नागराजा तक्षक, ज्याचे स्मृतीत आज पाकिस्थानातील तक्षशीला आहे. चवथा नागराजा करकोटक तर पाचवा ऐरावत (रावी नदीच्या शेजारी). या पाच नागराजांची गणराज्ये ऐकमेकांच्या राज्याला लागून होती. त्यांच्या क्षेत्रातील लोकांनी या पांच पराक्रमी राजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जो दरवर्षी उत्सव आयोजित केला तो नागपंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे अनुकरण देशातील अन्य प्रांतातील लोकांनी केले. नागपंचमी हा उत्सव देशभर साजरा होऊ लागला. यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर सापात केले. नाग ही सापांची पंचमी झाली व नागलोकांची पंचमी लुप्त झाली. आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. तरीपण आजही आपण घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलो नाही. हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होत. धार्मिक परिघाच्या बाहेर येऊन नागपंचमी सणाचे महत्व नागवंशीयांनी जाणावे, यासाठीच हा पोस्टप्रपंच. (साभार:- सदधर्म सभ्यता संघ (SSS) मासिक, अंक- जुलै २०१२)
Posted on: Sun, 18 Aug 2013 05:28:17 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015