नरेंद्र मोदींना एक तर - TopicsExpress



          

नरेंद्र मोदींना एक तर खरोखरच इतिहास माहिती नसावा किंवा ते हेतुपुरस्सर खोटा, अर्धवट आणि दीशाभूल करणारा इतिहास सांगत असावे… परवा एबीपी न्यूजवर खेडा जिल्ह्यातील त्यांचे भाषण ऐकले… ते म्हणाले की, श्यामाप्रसाद मुखर्जींचं निधन लंडनमध्ये झालं आणि त्यांची शेवटची इच्छा होती की, भारत स्वतंत्र झाल्यानंतरच त्यांच्या अस्थी लंडनवरून भारतात नेण्यात याव्या… देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसने सर्वात आधी त्यांच्या अस्थी भारतात आणायला हव्या होत्या परंतु, काँग्रेसने हे काम केलं नाही, असं मोदींचं म्हणणं होतं… विशेष म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं निधन भारतातच झालं होतं आणि ते देखील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर… त्यामुळे त्यांच्या अस्थी स्वातंत्र्यानंतर भारतात आणण्याचा वगैरे प्रश्नच उद्भवत नाही… खरे तर नरेंद्र मोदींना क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या बद्दल सांगायचे होते… पण् मोदींनी मोठा घोळ करून ठेवला… या प्रकारातून एक गोष्ट स्पष्ट होते की, मोदींची भाषणे स्वत:ची नसतात तर त्यांना ते कोणी तरी लिहून देतं… लिहून देणा-याने श्यामजी कृष्ण वर्मा यांचेच नाव लिहून दिले असावे आणि त्यांची संक्षिप्त माहिती दिली असावी… पण मोदींनी वर्मांच्या ऐवजी श्यामाप्रसाद मुखर्जींचे गुणगाण केले आणि त्यांचा मृत्यू लंडनमध्ये झाल्याचे जाहीर करून टाकले… अशीच चूक त्यांनी पाटण्याच्या सभेत तक्षशीलाबाबत केली होती… तक्षशीला बिहारमध्ये असल्याचा अफलातून शोध त्यांनी लावला होता…
Posted on: Tue, 12 Nov 2013 07:19:16 +0000

Trending Topics



ody" style="min-height:30px;">
How to Buy Cable Matters Gold Plated DisplayPort to VGA Cable 15

Recently Viewed Topics




© 2015