बृहन्मुंबई - TopicsExpress



          

बृहन्मुंबई महानगरपालिका, जनसंपर्क विभाग क्रमांक – पीआरओ/ २८६ /पी, दिनांक – १२.०७.२०१३ ------------------- पाण्याचा पिवळसर रंग दिसत असला तरी ते अपायकारक नाही. नागरिकांनी घाबरु नये ---------------- बृहन्मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱया भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोराची पर्जन्यवृष्टी होत असल्याने नदीतून पिसे येथे उचलण्यात येणाऱया पाण्याची गढूळता जी नेहमी ४.० ते ५.० एन. टी. यु. या दरम्यान असते, ती १५० ते ५२२ एन. टी. यु. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे ह्या गढूळ पाण्यावर गाळणी तसेच पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक अशा सर्व प्रक्रिया पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पूर्ण क्षमतेने केल्यावरही शुद्धीकरण केलेल्या पाण्यातील गढूळतेचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त रहाते. त्यामुळे पिवळसर पाणी दिसत असले तरी ते पिण्यायोग्य नि पूर्णतः निर्जंतुक असल्याचा खुलासा पालिका प्रशासनाने केला आहे. याबाबतीत पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारी येत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने हा खुलासा करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते आहे की, मुंबई शहरास पुरवठा करण्यात येणारे पाणी सद्या गढूळ दिसत असले तरीही ते पूर्णतः प्रक्रिया, निर्जंतुक (Chlorinated) नि पिण्यायोग्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. *** Water supply is pure & chlorinated --------------------- Due to heavy rains in the catchment areas of Bhatsa Dam, supplying water to Greater Mumbai City, the turbidity of water lifted from river at Pise, is increased drastically from normal 4-5 NTU to 150-522 NTU. Inspite of treating this water of Panjrapur Treatment plant at its full capacity the turbidity of treated water is more than the normal turbidity. Due to this the complaints are received from public for yellowish water. Hence, Citizens of Mumbai are hereby informed that even if the water supplied in Greater Mumbai City looks turbid, the water is chlorinated (i.e. disinfected). As a precautionary measure, Citizens of Mumbai are requested to boil & filter the water before drinking. ***
Posted on: Sun, 14 Jul 2013 19:43:39 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015