सुप्रभात....तुषार जोशी - TopicsExpress



          

सुप्रभात....तुषार जोशी ह्यांच्या नैना ह्या पत्र लामिकेतील पुढील पत्रा पासून सुरुवात करूया.... प्रिय नैना, रोमँटिक किंवा ज्यांना फर्स्ट लव सिनेमे म्हणता येईल असे पहायला खूप आवडतात त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या सिनेमांमधे एक तरूण नायक असतो आणि एक गोजिरी नायिका असते. नायकाचे नायिकेवर अतोनात प्रेम असते, नायिकेचे सुद्धा नायकावर तितकेच अतोनात प्रम जडते, त्यांना बऱ्याच अडचणी येतात पण शेवटी त्या दोघांचे स्वप्न पूर्ण होते. असा चित्रपण पाहता पाहता लगेच स्वतःला नायकाच्या रूपात कल्पना करणे आणि नायिकेचा होकार मिळवून प्रणयाराधन करणे किती छान वाटते. या चित्रपटातून अजून एक आशा मिळते की आपण ज्या व्यक्तीवर अतोनात प्रेम करतो ती शेवटी आपल्याला मिळतेच, की ती व्यक्ती कधी आपल्याला नाही म्हणूच शकत नाही. ही आशा हवी हवीशी असते आणि त्यामुळेच तो चित्रपट मनात राहतो. माझ्या सिनेमाची नैना, तू सध्या एकमात्र प्रेक्षक आहेस आणि माझ्या चित्रपटाचा दिग्दर्शक कुठल्यातरी ढगात बसून अॅक्शन म्हणतोय आणि पटकथा पण मला देत नाहीये. स्वतःची पटकथा स्वतःच लिहायची आणि मग ती वठवायची यात केवढी रिस्क आहे नाही का गं? आपल्या चित्रपटाचा शेवट गोडच व्हावा ही तीव्र इच्छा आहे. नायक नायिकेवर अतोनात प्रेम करतो आहे आता माझ्या कहाणीत काही टर्न हवा आहे, काही अजून हवे आहे गं? एक घुमाव चाहिये, एक सॉलिड वळण हवे आहे. कविता (छंद: श्यामाराणी) तुझं पाहणं सुंदर तुझं स्मरणं सुंदर किती चांदणं सुंदर झाला चकोर धुंद कृष्ण वेणूची तू धून जाते काळीज वेढून जग कामे विसरून रंगले तुझ्यामधे जसा अवखळ झरा तुझा चेहरा हसरा रोगी होणारच बरा पाहता क्षणामधे ~ रोहित (छंद: [ | प | प ] दोन व अधिक चरण, [ | प | प | प | - - - ] एक चरण, बरेचदा (आठ, आठ, आठ, सात) अश्या चार ओळी लिहिल्या की या छंदात बसतात. हे रामरसायन (रोहिणी) छंदाच्याच पद्धतीने एक ओळ वेगळी असा छंद आहे. आधीच्या कवींनी या छंदात कडवी लिहिताना पहिल्या तीन ओळीत यमक पाळलेले दिसते. पान ३६ मधे वर्णन केलेले धनाक्षरी किंवा कवित्त छंद याच श्यामाराणी छंदातल्या चार कडव्यांना योजून आणि अजून काही बंधन पाळून करण्यात येते.) (उत्सुक) रोहित माहित असलेली श्यामाराणी मधली काही उदाहरणे: आम्ही जाणावे ते काअी तुझे वर्म कोण्या ठायी अन्तपार नाही नाही अैसे श्रुती बोलती (संत ज्ञानेश्वर) राम आकाशी पाताळी राम नांदे भूमंडळी रामयोगीयांचे मेळी सर्व काळ तिष्ठत (संत रामदास) (रोहितची डायरी / तुष्की, नागपूर) ०४ ऑक्टोबर २०१३, ०८:०० +९१-९८२२२-२०३६५ tusharvjoshi [at] gmail [dot] com
Posted on: Tue, 08 Oct 2013 01:43:02 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015