------------- अतिभयानक पीजे - TopicsExpress



          

------------- अतिभयानक पीजे -------------- एक बाई दुसर्‍या बाईला विचारले प.बा.:तुम्ही गहू कसा आणला? दु.बा.:पिशवीतून आणला प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला? दु.बा: चुलत भावाने आणला ----------------------------- Do u know d meaning of M.P.M.N.? ? ? ? ? ? ? ? ? ? Mala Pan Mahit Nahi! -------------------------------- गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल? दुकानदारः ७ रुपये.. गावकरी: ठीक आहे राहिलेल्या ३ रुपयाची चॉकलेटं द्या... ------------------------------- जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल? : : : : : : : फुल भाजी ------------------------------- भुगोलाचे शिक्षक: सांगा पाहू, महाराष्ट्रात सर्वात जास्तं पाउस कुठे पडतो? बंड्या: जमिनीवर.. ------------------------------ प्रियकर प्रेयसीला प्रेमाने म्हणाला, "ते बघ ते झाड".. आणि मग.. मग काय.. . प्रेयसी झाडू लागली ---------------------------------- बंड्या: आई ..आई, बाहेर एक मिशीवाला आला आहे...! आई: त्याला सांग, आम्हाला नकोत, बाबांच्या आधीच आहेत... ------------------------------------- एकदा धीरुभाई अंबानी स्वर्गातून फोनवर: अरे अनिल बेटा आपला रिलायन्स ईंडिया मोबाईल चा बिझनेस काय म्हणतोय? अनिल: पापा तुमचा आवाज नीट येत नाहिये माझ्या एअरटेल वर फोन करा.. ------------------------------ बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात बॉ.फ्रे.: काय घेणार? ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच.. बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !! ------------------------------ े नवरी : आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू मला कुठे नेशील ? नवरा : अफ्रीकन सफारीला नवरी : आणि लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ? नवरा : मी तुला अफ्रीकेहून परत आणेन
Posted on: Wed, 21 Aug 2013 04:51:45 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015