सावधान! आता नौकरीच्या ही - TopicsExpress



          

सावधान! आता नौकरीच्या ही बोगस जाहिराती, उमेदवारांनी प्रत्येक जाहिरातींची प्रथम खात्री करणे आवश्यक !!! राज्यात मोठ्या प्रमाणात नोकर भरती चालू असून यामध्येही बोगस जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगारांची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न होत असून बेरोजगारांनी अशा बोगस जाहिराती पासून दक्ष राहण्याची गरज आहे व प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक जाहिरातींची खात्री करूनच अर्ज करावेत व आपली होणारी फसवणूक टाळली पाहिजे. सध्या अशीच एक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांचे नावाने नुकतीच भुसावळ, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यात कुशल कामगार भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली असून सदरील जाहिराती मध्ये सफाईदार ४८५३ पदे व आय टी आय साठी ६६४९ पदे असे एकून ११५०२ जागा भरण्याबद्दल असून विशेष म्हणजे स्वतंत्र व्यवसाय शिक्षण मंडळ किंवा सेवायोजन विभाग असताना सदरील तांत्रिक स्वरुपाची ची पदे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला भरण्याची गरजच काय? भरती जाहिरात प्रसिद्ध कधी व कुठल्या वृत्तपत्राला प्रसिद्ध झाली? डिमांड ड्राफ्ट शिक्षण मंडळाच्या नावे नाहीत? वास्तविक मंडळाचे मुख्य कार्यालय पुणे आहे मात्र अर्ज व परीक्षा फीस धनाकर्ष (डी.डी.) स्वरुपात नव्हे तर पोस्टल ओर्डर स्वरुपात ५००,४००,३००,१०० या प्रमाणे मुंबई च्या पत्त्यावर का मागविले आहेत? वास्तविक मंडळाचे संकेत स्थळ w w w.m s b s h s e . a c . i n असे आहे परंतु जाहिराती मध्ये maharashtraboardstate असा उल्लेख केलेला आहे? तसेच अर्ज करण्यासाठी तब्बल दोन महिने म्हणजे २३ ऑगस्ट २०१३ पर्यंत अवधी दिला आहे? एक न अनेक बाबी यात शंकास्पद असल्या कारणाने सदरील जाहिरात ही पूर्णपणे बोगस असल्याचे दिसून येते त्यामुळे उमेदवारांनी अशा जाहिराती पासून वेळीच सावधानता बाळगून आपले नुकसान टाळले पाहिजे व शिक्षण मंडळाने याचा खुलासा केला पाहिजे. We have traced contact details who is doing this : Company: Goyal Infotech, Mumbai Name of person: Vikas Goyal (email@goyalinfotech) Mumbai Maharashtra Tel. +91.555555555555 Fax. +91.5555555555 He registered the domain with wrong information. Government should take action on that person. Please Share It...Thanks !
Posted on: Mon, 15 Jul 2013 06:49:35 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015