नमस्कार! मी संदिप आज परत - TopicsExpress



          

नमस्कार! मी संदिप आज परत तुमच्यासाठी एक सत्यकथा घेऊन आलो आहे. ही कथा मी आपल्या आजी कडून ऐकली आहे.हा अनुभव तिच्या मैत्रिणिचा आहे.या घटनेला घडून फार वर्षँ लोटून गेली.आजिच्या मैत्रिण ला एक मुलगा आणि मुलगी होती.मुलीचं लग्न झालं होतं आणि तिला एक वर्षाचा मुलगा पण होता.मुलाच्या लग्ना करिता मुली पाहणे सुरू होते.त्यामुळे मग सगळे मुली बघण्यासाठी गावो गावी फिरत असायचे. असेच एके दिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तय झाला.आजीची मैत्रीण राहणारी चंद्रपुरची होती.कार्यक्रम ठरल्यावर तिने मग आपल्या मुलीला पण बोलावलं तिच्या पति आणि मुलासोबत.आता मोठ्या बहिणीची उपस्थिति तर जास्तंच महत्तवाची असते नाही का!आता आजीची मैत्रीण ,तिचे पति आणि मुलगा,तिची मुलगी आपल्या पति आणि मुलगा,व ड्राईवर असे मिळून ७ जण होते.त्यांनी मग एक मोठी गाडी केली आणि निघाले गावाला.मुलीचं गाव तसं चंद्रपुरच्या जवळच होतं.मुलीला पाहण्याचा कार्यक्रम आटोपला आणि आता सगळे घरी परत जाण्यास निघाले.ते ज्या रस्त्याने गावी आले होते त्याच रस्तयाने परत जाऊ लागले.गाडी काही अंतर गेली असेल की ड्राईवर ने तिला थांबवली.गाडी थांबवण्याचं कारण असे होते की रस्त्याच्या मधोमध एक भलं मोठं झाड आडवं पडलं होतं.आता गाडी तिथून नेणे मुळीच शक्य नव्हतं.पण ड्राईवर ला एक शार्टकट रस्ता माहित होता पण तो जंगलातून जात होता.सगळ्यांची परवानगी घेऊन मग ड्राईवर ने गाडी त्याच रस्त्याकडे नेली.रस्ता लहान.जंगल खुप दाट होतं.दुसर्या वाहनांची जास्तं आवाजाही नव्हती.म्हणुन ड्राईवर पण गाडी भरघोस वेगाने चालवत होता.तिथून जाता जाता आता रात्र झाली.आता तुम्हाला तर माहित आहे जंगलात मग तेव्हा किती अंधार असतो ते.फक्त उजेड होता तो म्हणजे यांच्या गाडीचाच.गाडी काही अंतर बरी चालली पण मग अचानकच बंद पडली. अरे!आता कसं.......!या गाडीला पण आताच बंद पडायचे होते.एक तर सोबत लहान मुल वरून जंगल आणि त्यात सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रात्रीचा काळोख आता जास्तंच पसरला होता.भयंकर अंधार झाला होता आता तिथे.कोणाला काहीच सुचेना काय करायचे ते.आजू बाजूचा सुगावा घेत मग त्यांना जंगलाच्या मध्ये एक घर दिसलं आणि तिथून कोणीतरी येतानी पण दिसलं.या लोकांना थोडं हायसे वाटलं.येणारे ५ जण होते.ते आता यांच्या जवळ आले होते.त्यामध्ये ३ माणसं व २ बायका होत्या.ते यांची परिस्थिति पाहूनच समजले व त्यांना स्वतः सोबत आजची रात्र कापायचा आग्रह केला.आता सोबत असलेल्या मुलाचा व रात्र आणि जंगल या सगळ्यांचा विचार करून त्यांनी या गोष्टीची हमी दिली.पण ड्राईवर मात्र किती केल्या तयार नाही झाला आणि तसेही त्याला गाडी पण सुधरवायची होती.म्हणुन तो बाहेरच थांबला व हे ६ जण त्यांच्याबरोबर घरी गेले.घरात गेल्यावर सगळे झोपी गेले.प्रवासाने सगळे थकुन गेले होते त्यामुळे यांना झोप पण लवकर लागली.सगळे गाढ झोपेत होते.अर्धा एक तास तर सगळं ठिक होतं, पण मग थोड्याच वेळा नंतर आजीच्या मैत्रीणिँच्या मुलीचं लहान मुलगा रडत उठून बसला.त्यामुळे तिची झोप उघडली व त्याला शांत करण्यासाठी ती पण उठून बसली.ती त्याला शांत करतच होती कि अचानक तिची नजर समोर गेली.ते बघुन तर तिच्या अंगावर काटाच उभा राहिला.घाबरत मग तिने आपली नजर सहजच दुसर्या दिशेला टाकली तर तिला आता जबरदस्त थरकाप सुटला व तिच्या तोंडून आता एक आवाज नव्हता निघत.असं काय पाहिलं तिने कि तिचा आवाजच बंद झाला.तो म्हणजे पहिल्यांदा तर तिला त्या ५ जणा मधुन एका बाई ने आपली जीभ बाहेर काढली आणि लांब करून तिथे ठेवलेल्या दिव्याला विझवले,आणि दुसर्याच दिशेला एक बाई चक्क आपले पाय चुलीमध्ये ठेवून त्याच्यावर कसलेतरी मांसाचे पदार्थ शिजवत होती आणि आपले पुर्ण केस मोकळे सोडले होते.त्यांचे नख पण खुप वाढलेले होते,आणि आता ती मोठमोठ्याने भेसुर आवाज पण काढत होती.आता तुम्हीच सांगा कोणी पण असे दृश्य पाहून घाबरेलच न.ते सगळं पाहून तर आता ती खुपच घाबरली होती.आता तिला कळून चुकलं होतं कि ती माणसं नसून भुतं होती.तिने पटकन सर्वाँना उठवलं आणि सगळी गोष्ट त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली.आता ते पण खुप घाबरले आणि पटापट तिथून कसेबसे ते सर्व जण पळत सुटले.धावता धावता मुलगी पाय मोडून जमीनीवर पडली.सगळे समोर निघाले आणि ती भुते पण त्यांच्या मागे होती.पडल्यामुळे तिच्या हातात असलेला मुलगा पण रडत होता.मुलीचा पति तिला उचलायला धावला.पटकन कसेही करून ती उठली आणि आपले मुल घेऊन तिथून धावली.ते धावत धावत आपल्या गाडीजवळ जाऊन पोचले.तो पर्यंत ड्राईवर ने गाडी पण सुधरावली होती.त्याला पण हा सगळा प्रकार कळला तर तो खुप घाबरला.तो पर्यँत ती ५ ही भुते आपल्या असली रूपात आली होती.मोठमोठाली नखं मोकळे केस,सुळ्यासारखे दातं अति भयानक रे बाबा.जेव्हा त्यांना आपली शिकार हातची जाता नी पाहिली तेव्हा ते मोठमोठ्याने भेसूर आवाज काढत तिथून त्यांच्या मागे बाहेर आले.पण आजीच्या मैत्रीणिचे आणि त्यांच्या लेकरांचे नशीब चांगले कि ते पटकन गाडीत बसले. ड्राईवर पण घाबरून गाडीत बसला पण चावी बाहेरच पडली.तिकडे ती भुते जवळ आली आणि इकडे ड्राईवर चावी घ्यायला बाहेर पडला.त्याने पटकन चावी उचलली तो पर्यँत ती भुते त्या ड्राईवरच्या अगदि जवळ आली होती.त्याने चावी उचलली आणि गाडी कडे पळायला आणि आत मध्ये बसला.पटकन चावी गाडीला लावली त्याचे हात पण थरथरत होते.तरी त्याने चावी लावली आणि गाडी सुरू झाली.ड्राईवरने गाडी आता चांगल्याच वेगाने पळवली.त्यांचे नशीब बलवत्तर होते कारण एक तर भुतं लोखंडाला भितात आणि त्यातून सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे गाडीत देवांचे फोटो होते.तर ड्राईवर ने गाडी जे पळवली ती शेवटी घरी जाऊनच थांबली.घरी पोचल्यावर सगळे जण चांगलेच बीमार पडले.आता आजीच्या मैत्रिणिंची वय खुप झाली आहे पण जेव्हा जेव्हा तिला हा किस्सा आठवतो तर अजून ही थरकाप सुटतो.आणि ती नेहमी देवाचा आभार मानते. धन्यवाद!
Posted on: Sun, 10 Nov 2013 16:27:17 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015