पोलिस उपनिरीक्षक(PSI)••• - TopicsExpress



          

पोलिस उपनिरीक्षक(PSI)••• पोलिस उपनिरीक्षक परीक्षेस बसण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप अवगत असणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप समजून घेऊया. अ) पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा योजना परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची संख्या - 150 एकूण गुण - 300 परीक्षेचा कालावधी - 2 तास परीक्षेचे मानक (दर्जा) - पदवी ... परीक्षेचे माध्यम - मराठी व इंग्रजी परीक्षेचे स्वरूप पाहता (बहुपर्यायी) मोजक्या र्शमात उमेदवारांना अभ्यासक्रमाचा डोंगर कसा सर करता येईल यावर भर द्यावा लागणार आहे. आयोगाने नुकतेच विविध पदांसाठी घेतल्या जाणार्या मुख्य परीक्षांकरिता असलेल्या अभ्यासक्रमा बदल केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतही बर्याच उमेदवारांच्या मनात गोंधळ असेल. परंतु आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा या अभ्यासक्रमात कुठलाही बदल केलेला नसून तो पूर्वीसारखाच आहे. अभ्यासक्रमाचा आवाका समजून घेण्यासाठी आयोगाने या परीक्षेकरिता जाहीर केलेला अभ्यासक्रम पूर्ण नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे संदर्भ पुस्तके वाचताना कोणत्या भागाला किती महत् द्यायचे ते विद्यार्थ्यांनाठरवता येते. (हा अभ्यासक्रम हा आयोगाच्या .mpsc.gov या वेबसाइटवर उपलब्ध आहे) ब) पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम व गुणविभाजन • अंकगणित- बेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार , सरासरी , दशांश , अपूर्णांक (प्रश्न 20, गुण 40) • भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित) - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांक्ष, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे (प्रश्न 20, गुण 40) • भारताचा सामान्य इतिहास (1857 ते 1947) (प्रश्न 20, गुण 40) • नागरिकशास्त्र - भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, • राज्यव्यवस्थापन(साधारण प्रश्न 15, गुण 30) • ग्रामव्यवस्थापन- (प्रश्न 08, गुण 16) • अर्थव्यवस्था - भारतीय पंचवार्षकि योजनांची ठळक वैशिष्टड्ये (प्रश्न 07, गुण 14) • सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र,वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र (प्रश्न 20,गुण 40) • महाराष्ट्रातील समाजसुधारक - गो. ग. आगरकर, शाहू महाराज, म. फुले, महर्षी कर्वे, डॉ. आंबेडकर (प्रश्न 20,गुण 40) • चालू घडामोडी - भारतीय व जागतिक (प्रश्न 20, गुण 40) या परीक्षांचा अभ्यास म्हणजे दिवसातून किमान 10 ते 12 तास द्यायला पाहिजे असा बहुतेक उमेदवारांचा गैरसमज असतो. पण अधिक तास अभ्यास म्हणजे परीक्षेत यश असा फॉर्म्युला नसून अभ्यासाचे काळजीपूर्व अचूक नियोजन करणे हा खरा फॉर्म्युला आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आगामी परीक्षेसाठी इच्छु उमेदवारांनी उपलब्ध वेळ व अभ्यासाचा आवाका याची सांगड कशी घालावी ते पाहूया. क) अभ्यासाचे नियोजन व वेळापत्रक अभ्यासक्रमातील 9 मुद्दय़ांचा अभ्यास कमी दिवसांत करण्याचे लक्ष्य आता आहे. त्यातील अंकगणित व चालू घडामोडी या विषयांचा अभ्यास सराव व सातत्यावर अवलंबून आहे. हा पाया भक्कम असेल तर हे 80 गुण मिळवणे सहज सोपे होते. त्यासाठी रोज किमान एक तास अंकगणित व 1 तास चालू घडामोडींच्या अभ्यासाला द्यावा. उर्वरित 7 विषयांचा अभ्यास उमेदवाराच्या वाचन, ग्रहण व आकलनशक्तीवर आधारित असतो. कारण या विषयांसाठी उपलब्ध संदर्भ पुस्तके ही प्रत्येक उमेदवाराने हाताळलेली असतात. परंतु त्यातील प्रत्येक मुद्दय़ाचे सखोल ज्ञान असणे आयोगाला अभिप्रेत असते. संदर्भ पुस्तके व्यवस्थित, काळजीपूर्वक वाचावीत. वाचताना महत्त्वाच्या मुद्दय़ांखाली खूण करून ठेवायची सवय ठेवावी. सर्व मुद्दय़ांचे एका वेगळ्या नोंदवहीत नोंद करून आपल्या मायक्रो नोट्स तयार कराव्यात. जेणेकरून परीक्षेच्या अगोदर एक आठवडा तुम्हाला त्या नोट्स रिव्हिजन करायला उपयोगी पडतील. अखेरच्या काही दिवसांत विषयावर आयोगाने यापूर्वी विचारलेल्या सर्व प्रश्नांचा सराव करावा. वाचनात न आलेले मुद्दे पुन्हा वाचून त्याचा समावेश आपल्या नोट्समध्ये करावा. वेळेत पेपर सोडवून व्हावा यासाठी पोलिस उपनिरीक्षक परीक्षा पेपर संच बाजारात उपलब्ध आहे. त्यातील आयोगाच्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवण्याचा सराव करावा. ड) अभ्यासक्रमातील विषयांवर उपलब्ध संदर्भ पुस्तके सपर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या उमेदवारांसाठी बाजारात संदर्भ पुस्तकांची रेलचेल असते. त्यामुळे या क्षेत्रात नवीन आलेल्या उमेदवारांना सुरुवातीला काय वाचावे आणि कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही. उमेदवारांचा सुरुवातीचा अमूल्य वेळ योग्य संदर्भ पुस्तके शोधण्यातच वाया जातो. हे टाळण्यासाठी सर्व विषयांची दर्जेदार संदर्भ पुस्तके आधीच संग्रही असणे आवश्यक आहे. अभ्यास करताना एकाच विषयाची खूप पुस्तके वाचण्यापेक्षा या दर्जेदार पुस्तकांचे वारंवार वाचन करण्यावर भर द्यावा. • अंकगणित - अंकगणित , पंढरीनाथ राणे तसेच 7 वी स्कॉलरशिपची पुस्तके • भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित) - 8 थी ते 10 वीपर्यंतची भूगोलची क्रमिक पुस्तके, भूगोल : सवदी , भूगोल - जयकुमार मगर तसेच सामान्य क्षमता चाचणी स्टडी सर्कल मार्गदर्शनचा आधार घ्यावा. • भ रताचा सामान्य इतिहास (1857 ते 1947) - भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास : जयसिंगराव पवार , 8 वी ते 10 वी क्रमिक पुस्तके • नागरिकशास्त्र - भारतीय राज्यघटना : घांगरेकर , राज्यघटना : वर्हाडकर • ग्रामव्यवस्थापन- पंचायत राज : प्रा. यवलमाड, भारतीय • शासन व राजकारण : पी. बी. पाटील • अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1 व 2) भोसले व काटे, • भारतीय अर्थव्यवस्था : रंजन कोळंबे, वाणिज्य व अर्थव्यवस्था मार्गदर्शक स्टडी सर्कल, भारतीय • अर्थव्यवस्था : प्रतियोगिता दर्पण, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी • सामान्य विज्ञान - विज्ञान व तंत्रज्ञान अशोक जैन व चितानंद जैन : शेठ प्रकाशन, विज्ञान व तंत्रज्ञान : जयसिंगराव पवार, सा. क्षमता चाचणी विज्ञान विभाग( स्टडी सर्कल) • महाराष्ट्रातील समाजसुधारक - महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास : भिडे पाटील • चालू घडामोडी - चालू घडामोडी : दत्ता सांगोलकर, तसेच तुम्ही या विषयाचा अभ्यास करण्यासाठी संगणक तंत्रज्ञान, इंटरनेटचा वापर करू शकाता. जसे, .newshunt , generalknowledge यासारख्या वेबसाइटवरून अद्ययावत माहिती मिळू शकते. ई) परीक्षेला जाताना- परीक्षेला जाताना गोंधळून न जाता मन शक्य तेवढे स्थिर, तणावमुक्त ठेवावे. जाताना पोटभर जेवून किंवा काहीच न खाता जाणे चुकीचे आहे. शक्यतो सुस्ती येणार नाही असे हलके पदार्थ खाऊन जावे. काही उमेदवार परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्री जागरण करीत वाचत असतात व त्यामुळे ऐन परीक्षेत गोंधळून जातात. हे टाळण्यासाठी किमान एक दिवस आधी सर्व अभ्यास पूर्ण झालेला असावा. आदल्या दिवशी पूर्ण झोप घ्या. परीक्षेस जाताना प्रसन्न मनाने व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जा. स्वत:च्या मेहनतीवर, जिद्दीवर पूर्ण विश्वास ठेवा व परीक्षेस सामोरे जा म्हणजे यश तुमचेच असेल.!!!!! तुमचा मित्र -# अमोल जाधव,( Mpsc upsc aspiring ) माहिती आवडली तर शयर जरुर करा. . . . .!!!!
Posted on: Wed, 31 Jul 2013 06:42:34 +0000

Trending Topics



...............OPEN POST FREE SPITT................. TOPIC
July 18 I am nearer than you think, richly present in all your

Recently Viewed Topics




© 2015