परवा डोर (DOR) हा सिनेमा - TopicsExpress



          

परवा डोर (DOR) हा सिनेमा पुन्हा एकदा पाहिला. हा सिनेमा माझ्या फार जवळचा आहे. तसा हा सिनेमा जेव्हा पहिल्यांदा बघितला होता तेव्हाच कुठेतरी आत पोचला होता आणि मग वेळोवेळी तो बघतच राहिले दोन पुरुषांची मैत्री आपल्याला फार नवीन नाही अगदी हिंदी सिनेमात सुद्धा, ये दोस्ती हम नही तोडेंगे. म्हणत गाणारे अमिताभ आणि धर्मेंद्र काय आणि यारी ही इमान मेरा म्हणत नाचणारे प्राणसाब काय, आपल्याला ओळखीचे आहेत पण दोन बायकांची दोस्ती इतकी सुंदर रित्या दाखवलेली जवळ जवळ पहिली नाही. शत्रूचा शत्रू तो माझा मित्र म्हणत दुष्ट कपट करणाऱ्या बायकांची मोठ्ठी रांग मालिकांमधे आपण बघतोच पण दोन बायका त्या सुद्द्धा वेगवेगळ्या धर्माच्या, भाषेच्या आणि विचारांच्या केवळ परिस्थितीने एकमेकांच्या सानिध्यात आलेल्या पण एकमेकींच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातात. धडाडीची बाणेदार झीनत, आनंदी आणि स्वच्छंदी असलेल्या पण केवळ समाजाच्या घालून दिलेल्या रुढींनी गांजून वाट्याला आलेले बेरंग आयुष्य जगत असलेली मीरा नकळत आपल्यातल्या होऊन जातात. आपल्या घराण्याची शान आणि त्याचा वायदा देत मीरा ला बेरंग आयुष्य जगायला लावणारा आणि वेळ आल्यावर तिलाच विकायला निघालेला तिचा सासरा आपल्या समाजातल्या दुटप्पी मनोवृत्तीचे अगदी समर्पक उदाहरण. स्वत:चा नवरा तिथे दूर देशी फाशीची वाट बघत बसलेला असताना त्याला सोडवायला आलेल्या माफीच्या पत्रावर मीरा ची सही घायला आलेली झीनत तिचे दिशाहीन आयुष्य बघून नकळत तिच्यात गुंतून जाते, ये कैसा समाज है जो औरत को अपना दुख भूलने हि नाही देत म्हणत मीरा च्या आयुष्यात चार चांगले दिवस दाखवायला धडपडते. माफीनामा घेऊन निघालेली मीरा आणि झीनतने तिला अगदी शेवटच्या क्षणी आपल्याबरोबर नेणे म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण बरेच जण करत असलेले small act of kindness वाटते. बहुरूपी असलेला श्रेयस तळपदे जो झीनत ला या प्रवासात मदत करतो. ज्याला तडफदार. करारी झीनत आवडायला लागते पण म्हणून तो काही हात धुवून पिसाटा सारखा तिच्या मागे लागत नाही कि उगाच सिनेमाची मिनिटे वाढवायची म्हणून त्यांचे लफडे वगैरे दाखवलेले नाही. अगदी एकाच झोपडीत राहतात ते आणि बाजू बाजूच्या खाटांवर झोपून गप्पा मारतात अगदी जुने भेटलेले मित्र भेटल्यावर जशा गप्पा मारतील तसे. मला तर झीनत आणि बह्रूरुपी श्रेयस मधले equation स्त्री पुरुष मैत्रीचे उत्तम उदाहरण वाटते. ये हौसला कैसे झुके (youtube/watch?v=d8me1GXijJA) हे एक नितांत सुंदर गाणे माझे आयुष्यातले फार महत्वाचे गाणे आहे. आयुष्यात किती तरी वेळा आता सगळे संपले आणि कुठे काही वाट दिसत नाही असे क्षण आले पण या गाण्याने मला कित्येक वेळा जणू प्रेमळ मित्राची पाठीवर पडलेली थाप आहे अशी साथ दिलेय. मला जे अनेक वर्षापासून ओळखतात किंवा चांगले ओळखतात ( तसा दोन्ही मध्ये फरक आहे पण असो) अशा सगळ्यांना या गाण्याशी माझे असलेले connection माहिती आहे. काही वर्षांपूर्वी एका कोणत्या एका संध्याकाळी, सह्याद्री मधल्या एका कातळावर बसून सूर्यास्त पाहत असताना ऐकलेले हे गाणे आणि तो सगळा माहौल आठवला तरी रोमांच उभे राहते. माझा एक मित्र मला म्हणतो कि त्याला जेवढे सिनेमाने शिकवले तेवढे फार कमी गोष्टींनी शिकवले. हे सगळे लिहिण्याचा एवढाच उद्देश आहे कि सगळे छान छान आणि गोड असेलेले, मोट्ठे महाल आणि केवळ संध्याकाळ च्या पार्टी मध्ये काय घालावे यासाठी काळजीत पडलेली कोण एक बाई किंवा काहीतरी याच्याशी लग्न करू कि त्याच्याशी असले तद्दन फालतू सिनेमे आपण सगळे बघतोच पण या दिवाळीत खरच आपले मन उजळून टाकणारा एखादा सिनेमा बघितला तर दिवाळीची मजा नक्कीच वाढेल.
Posted on: Tue, 05 Nov 2013 01:31:41 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015